छपरी म्हणजे काय रे भाऊ? 'आदिपुरुष' फ्लॉप होताच ट्रेंड होतोय हा शब्द; जाणून घ्या अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:49 PM2023-06-18T12:49:59+5:302023-06-18T12:52:01+5:30

Adipurush: हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी पडलं.

chapari word on trend after adipurush here the reason why | छपरी म्हणजे काय रे भाऊ? 'आदिपुरुष' फ्लॉप होताच ट्रेंड होतोय हा शब्द; जाणून घ्या अर्थ

छपरी म्हणजे काय रे भाऊ? 'आदिपुरुष' फ्लॉप होताच ट्रेंड होतोय हा शब्द; जाणून घ्या अर्थ

googlenewsNext

दिग्दर्शक ओम राऊत (Om raut) याच्या 'आदिपुरुष' (adipurush) या सिनेमाची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी पडलं. या सिनेमातील संवाद, व्हिफक्स, कलाकारांचे कपडे यावर नेटकरी जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे हा सिनेम सपशेल फ्लॉप ठरल्याचं दिसून येत आहे. यामध्येच  सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. यात छपरी हा शब्द कमालीचा व्हायरल होत आहे. परंतु, छपरी म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न काहींना पडला आहे. म्हणूनच या शब्दामागचा अर्थ जाणून घेऊयात.

१६ जून रोजी आदिपुरुष हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेक जणांनी या सिनेमासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. प्रभास (prabhas), सैफ अली खान (saif ali khan), क्रिती सेनॉन आणि देवदत्त नागे( devdutta nage) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात झळकली. मात्र, तरीदेखील हा सिनेमा सपशेल अपयशी ठरला.

छपरी म्हणजे काय?

आदिपुरुष नापसंत पडल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी छपरी म्हणत या सिनेमाला ट्रोल केलं. यात छपरी हा शब्द नेमका आला कुठून हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, छपरी हा शब्द अनेकदा दैनंदिन व्यवहारात वापरला जात असल्याचं लक्षात येतं. खासकरुन कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींच्या तोंडात तर हा शब्द सर्रास असतो. एखादी गोष्टी, वस्तू वा व्यक्ती आपल्याला आवडली नाही की आपली नापसंती दर्शवण्यासाठी छपरी हा शब्द वापरला जातो. उदा. एखादी वस्तू न आवडल्यास काय छपरी आहे? असं म्हटलं जातं.

दरम्यान, प्रेक्षकांनी आदिपुरुष या सिनेमात अनेक त्रुटी काढल्या आहेत. यात सैफ अली खानचे कपडे, देवदत्त नागे याचे संवाद, प्रभासने केलेला श्रीरामांचा लूक यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर रामायणाच्या मूळकथेशी छेडछाड केल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.
 

Web Title: chapari word on trend after adipurush here the reason why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.