अभिनयासाठी चंद्रचूरने सोडला UPSC चा अभ्यास; एका अपघातामुळे झालं करिअर उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:04 PM2023-12-21T14:04:26+5:302023-12-21T14:04:45+5:30

Chandrachur singh: या अपघातामुळे चंद्रचूरच्या हातून अनेक सिनेमा गेले. अपघातातून तो बरा झाल्यानंतर त्याने पुन्हा अभिनय सुरु केला. मात्र..

chandrachur-singh-left-upsc-preparation-to-become-an-actor-life-clearly-changed-after-goa-major-accident | अभिनयासाठी चंद्रचूरने सोडला UPSC चा अभ्यास; एका अपघातामुळे झालं करिअर उद्धवस्त

अभिनयासाठी चंद्रचूरने सोडला UPSC चा अभ्यास; एका अपघातामुळे झालं करिअर उद्धवस्त

'तेरे मेरे सपने', 'माचिस' , 'जोश', 'दिल क्या करे', 'क्या कहना' अशा कितीतरी सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे चंद्रचूर सिंह. उत्तम अभिनयशैली आणि स्मार्टनेस यांच्या जोरावर चंद्रचूरने ९० चा काळ गाजवला. तेरे मेरे सपने या सिनेमातूनबॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याला माचिस या सिनेमातून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. विशेष म्हणजे  ९० च्या काळात त्याची तुफान लोकप्रियता होती. तो करिअरच्या टॉप फ्लोअरवर होता. मात्र, त्याच्या आयुष्यात असा एक क्षण आला ज्यामुळे त्याचं करिअर आणि नशीब सारं काही उद्धवस्त झालं. त्यामुळे आज तो इंडस्ट्रीपासून कोसोदूर झाला आहे.

बॉलिवूडमधील सर्वात जास्त शिक्षण घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत चंद्रचूरचा समावेश केला जातो. एकेकाळी आयएएस ऑफिसर होणाऱ्या चंद्रचूरने बरंच शिक्षण घेतलं आहे. इतंकच नाही तर तो युपीएससी या स्पर्धा परिक्षेची तयारी सुद्धा करत होता. मात्र, अभिनय क्षेत्रात तो आला आणि त्याचं नशीब पालटून गेलं. त्याने एका पाठोपाठ एक अनेक सुपरहिट सिनेमा दिले. परंतु, यशाच्या शिखरावर असताना त्याचा एक अपघात झाला. ज्यामुळे त्याचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. एका मुलाखतीमध्ये चंद्रचूरने या अपघाताविषयी भाष्य केलं.

चंद्रचूर गोव्यामध्ये वॉटर स्किइंग करत असताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला शारीरिक व्यायाम करणे, फिटनेस राखणं काहीही शक्य होत नव्हतं. फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार सुरु होते. हाताचं दुखणं इतकं वाढलं होतं की त्यामुळे त्याला अनेक सिनेमांच्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या. ज्यामुळे त्याच्या करिअरला उतरती कळला लागली.

दरम्यान, हातातून अनेक सिनेमा गेल्यानंतर तो पुन्हा करिअरकडे वळला होता. मात्र, चांगली स्क्रिप्ट मिळेल या आशेवर तो वाटच पाहात बसला. त्यानंतर २०२० मध्ये आर्या या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. परंतु, त्याचा लूक पाहून अनेक जण थक्क झाले. एकेकाळी चॉकलेट हिरो म्हणून लोकप्रिय असलेल्या चंद्रचूरचा बदललेला लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

Web Title: chandrachur-singh-left-upsc-preparation-to-become-an-actor-life-clearly-changed-after-goa-major-accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.