हे कधी, कसे झाले? काय चाहत खन्नाला डेट करतोय मिका सिंग? व्हायरल झालेत रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 10:25 IST2020-04-12T10:23:46+5:302020-04-12T10:25:40+5:30

कब हुआ?

chahatt khanna dating bollywood singer mika singh share romantic photos on instagram-ram | हे कधी, कसे झाले? काय चाहत खन्नाला डेट करतोय मिका सिंग? व्हायरल झालेत रोमॅन्टिक फोटो

हे कधी, कसे झाले? काय चाहत खन्नाला डेट करतोय मिका सिंग? व्हायरल झालेत रोमॅन्टिक फोटो

ठळक मुद्दे चाहत व मिका यांना एकत्र बघून साहजिकच चाहत्यांनी आपआपले तर्क लावणे सुरु केले.

मिका सिंगबद्दल खरे तर सगळेच जाणतात़ पण काही वर्षांपूर्वी एका पार्टीत सर्वांसमोर राखी सावंतला किस करून मिका सर्वाधिक चर्चेत आला होता. खरे सांगायचे तर याच घटनेनंतर मिकाला सगळे ओळखायला लागले होते. मिकाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले़ पण त्याचे एकही नाते फार काळ टिकले नाही. आता मिकाच्या आयुष्यात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.   तिचे नाव चाहत खन्ना.

होय, चाहत खन्नाने स्वत: तिच्या व मिकाच्या अफेअरच्या बातम्यांना हवा दिली, असे म्हणायला हरकत नाही. कारण तिने मिकासोबतचा एक फोटो शेअर केला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.\

होय, लॉकडाऊनच्या काळात चाहत व मिकाचा हा फोटो समोर आल्याने सगळीकडे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.   या फोटोला चाहतने ‘क्वारंटाईन लव्ह’ असे कॅप्शन दिले. चाहतनेच नाही तर मिकानेही चाहतसोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले. ‘क्वारंटाईनदरम्यान घरात खूप काही करता येण्यासारखे आहे. संगीत शिका, कला शिका, पार्टनरवर प्रेम करा, आवडीचे जेवण बनवा,’ असे त्याने लिहिले.

हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर जणू कमेंट्सचा पूर आला. हे कधी झाले? काय मिका चाहतच्या प्रेमात पडला? अशा प्रश्नांची नेटक-यांनी जणू सरबत्ती केली. कारण बहुतांश लोक लॉकडाऊनच्या काळात आपआपल्या पार्टनरसोबत आहेत. अशात चाहत व मिका यांना एकत्र बघून साहजिकच चाहत्यांनी आपआपले तर्क लावणे सुरु केले.

काय आहे सत्य?
आता चाहत व मिका यांच्यात नेमकी काय खिचडी शिजतेय, ते आम्ही तुम्हाला सांगतो. होय, तर तुम्ही समजताय तसले काही नाही. होय, चाहत व मिका लवकरच एक म्युझिक व्हिडीओ सॉन्ग घेऊन येत आहेत. त्याचे नाव आहे, ‘क्वारंटाईन लव्ह’. चाहत व मिकाने जे फोटो शेअर केले आहेत ते याच व्हिडीओ सॉन्गचे आहेत. मिका व चाहत दोघेही एकाच सोसायटीत राहतात. दोघांचीही चांगली मैत्री आहे. सोशल मीडियावरचे त्यांचे रोमॅन्टिक फोटो म्हणजे, प्रमोशनचा एक फंडा आहे.

Web Title: chahatt khanna dating bollywood singer mika singh share romantic photos on instagram-ram