घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:02 IST2025-12-25T10:01:48+5:302025-12-25T10:02:56+5:30

सेलिनाची पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी, एक आई म्हणून खूपच वाईट...

celina jaitly first chiristmas away from her three sons shared heart aching post | घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...

घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...

अभिनेत्री सेलिना जेटलीसाठी हे वर्ष कठीण होतं. काही दिवसांपूर्वीच तिने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. तसंच घटस्फोटासाठीही अर्ज केला. सेलिनाला तीन मुलं आहेत जी सध्या पतीसोबत ऑस्ट्रियामध्येच आहेत. ख्रिसमसलाही सेलिनाला आपल्या मुलांना भेटता आलेलं नाही याचं दु:ख तिने सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केलं आहे.

सेलिनाने मुलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "ख्रिसमस पूर्वसंध्याकाळ...तुम्ही कितीही दूर गेलात तरी प्रेम संपत नाही..ते आणखी वाढतच जातं. आज माझ्या प्रत्येक प्रार्थनेत तुम्ही आहात, माझी प्रिय मुलं. हा पहिलाच ख्रिसमस आहे जिथे मी तुमच्यापासून दूर आहे. विन्स्टन, विराज आणि आर्थर. विन्स्टन आणि विराजची १३ वर्ष आणि आर्थरच्या ८ वर्षात मी कधीच तुमच्याशिवाय ख्रिसमस साजरा केला नाही. या सगळ्या वर्षांमध्ये कितीही वेदना झाल्या, दु:ख झालं तरी मी तुमच्यासोबत होते. मी तुमच्यासाठीच ते सगळं सहन करत होते. तुमच्यासोबत प्रत्येक दिवस घालवत होते. तुमच्यासाठी कुकीज, पाणीपुरी, आणि आलू पराठाही बनवायचे. तुम्हाला अलजेब्रा शिकवायचे. तुम्ही खूप मस्ती केली की चिडायचे. मग तुम्हाला मिठी मारायच. लाड करायचे, तुम्हाला आवडत नसलं तरी सारखी अंघोळ घालायचे, आपण स्नो मॅनही बनवला, आपल्या सश्याला गाजर भरवलं, बर्फ पडत असताना आपल्या मोठ्या गार्डनमध्ये तुम्हाला कुशीत घेतलं, द अनकॅनी काउंटर पाहिलं आणि बरंच काही..."


ती पुढे लिहिते, "हे सगळं लिहिताना आज माझे डोळे भरुन आले आहेत. आज ख्रिसमसला मला तुमचा आवाजही ऐकता येत नाहीये यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हे किती कठीण आहे. मला आशा आहे ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला हे सगळं का घडलं ते समजेल. पण प्लीज हे समजून घ्या. या ख्रिसमसला मी सांतासोबत तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवणार आहे. मग त्यासाठी सांताच्या कितीही फेऱ्या होऊ दे तरी चालेल. कारण माझं तुमच्यावरचं प्रेम हे सांताच्या एका फेरीत सामावणारं नाही. त्यासाठी अगणित फेऱ्या लागतील. सांता तुमच्या घराभोवती गोल गोल फिरत राहील अशी आशा आहे. ते घर जे कधी काळी आपलं होतं. जोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा भेटत नाही तोवर... तुमची आई मम्मा काटजे."

सेलिनाच्या या पोस्टवर प्रिती जिंटानेही कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. तसंच चाहत्यांनी सेलिनासोबत घडत असलेल्या या सगळ्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. सेलिना ११ ऑक्टोबर रोजी तिच्या मुलांना सोडून भारतात परतली. पतीने तिला मध्यरात्री ऑस्ट्रियातील घर सोडण्यास भाग पाडलं होतं, असंही तिने सांगितलं.तसंच पीटर हाग तिच्या तिन्ही मुलांना भेटू  देत नसल्याचा आरोपही सेलिनाने केला आहे. दरम्यान,सेलिना जेटली आणि पती पीटर हाग यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना ओळखू लागले.या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं नंतर प्रेम आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.२०१० मध्ये सेलिना-पीटर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर २०१२ मध्ये तिला जुळं झालं. मग २०१७ मध्ये सेलिनाने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. दुर्दैवाने त्यातील एकाचं निधन झालं. 

Web Title : तलाक के बाद अभिनेत्री बच्चों से दूर, क्रिसमस पर मिलने से इनकार।

Web Summary : तलाक और दुर्व्यवहार के आरोपों के बीच, सेलिना जेटली ने ऑस्ट्रिया में अपने बच्चों से दूर एक दर्दनाक क्रिसमस बिताया। उन्होंने अपनी पीड़ा ऑनलाइन साझा की, पुरानी परंपराओं को याद किया और पुनर्मिलन के लिए अपने स्थायी प्रेम और आशा को व्यक्त किया।

Web Title : Actress separated from kids after divorce, denied Christmas visit.

Web Summary : Celina Jaitly, amidst divorce and abuse allegations, spent a painful Christmas away from her children in Austria. She shared her heartbreak online, recalling past traditions and expressing her enduring love and hope for reunion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.