​सेलिना जेटलीने शेअर केला बिकनीतील बेबी बम्पचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 13:20 IST2017-06-27T07:49:58+5:302017-06-27T13:20:30+5:30

बॉलिवूडमध्ये नसली तरी सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री सेलिना जेटली जुळ्या मुलांची आई आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ...

Celina Jaitley shares a bikini baby bump photo! | ​सेलिना जेटलीने शेअर केला बिकनीतील बेबी बम्पचा फोटो!

​सेलिना जेटलीने शेअर केला बिकनीतील बेबी बम्पचा फोटो!

लिवूडमध्ये नसली तरी सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री सेलिना जेटली जुळ्या मुलांची आई आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. विंस्टन आणि विराज अशा दोन मुलांची आई असलेली सेलिना दुसºयांदा प्रेग्नंट आहे. विशेष म्हणजे, याही वेळी सेलिना जुळ्यांनाच जन्म देणार आहे.  



सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करणाºया सेलिनाने तिच्या बेबी बम्पचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती बिकनीत दिसते आहे. 
सेलिनाने स्वत: तिच्या प्रेग्नंसीची बातमी जाहीर केली होती.  मी पुन्हा प्रेग्नेंट आहे, हे ऐकून मला आनंदच झाला. पण पुन्हा जुळी आहेत, हे माझ्यासाठी धक्कादायक होते. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले. पीटरने अगदी सहज म्हणून त्यांना विचारले की, याही वेळी जुळी आहेत का? डॉक्टरांनी हो म्हटले. त्यांचा होकार आमच्यासाठी काहीसा धक्कादायक होता. पण  परमेश्वरांसाठी आम्ही स्पेशल पॅरेंट असू. कदाचित म्हणून त्यांनी आम्हाला खूप सारी मुलं देण्याचे ठरवले असेल, असे मानून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी आणि पीटर आम्ही दोघांनीही अतिशय आनंदाने ही नवी जबाबदारी स्वीकारली आहे आणि आम्ही मी अतिशय योग्यरित्या पार पाडू, असे तिने सांगितले होते.
माजी विश्वसुंदरी असलेल्या सेलिनाने २००१ साली फेमिना मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने २००३ साली ‘जानशीन’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नो एन्ट्री, अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स इत्यादी काही तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

ALSO READ : ​आपल्या लाडक्या ‘या’ ८ अभिनेत्री लग्नाअगोदर होत्या प्रेग्नंट !

सेलिना सध्या एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुढील वर्षी प्रकाशित होणार आहे. २३ जुलै २०११ रोजी सेलिनाने आॅस्ट्रिया येथे बॉयफ्रेन्ड पीटर हग याच्यासोबत गुपचूप लग्न केले होते.

Web Title: Celina Jaitley shares a bikini baby bump photo!