‘नोटा’च्या मुद्यावर सेलिब्रिटींचा ‘टिवटिवाट’..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 14:00 IST2016-11-09T13:35:00+5:302016-11-09T14:00:39+5:30
काळा पैसा, नकली नोटा आणि भ्रष्टाचार या भारतीय अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या तीन गोष्टींचे उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून ५०० व १००० ...

‘नोटा’च्या मुद्यावर सेलिब्रिटींचा ‘टिवटिवाट’..!
अर्जुन कपूर :
सामाजिक मुद्यांवर अर्जुन कपूर सातत्याने ट्विटरवरून त्याचे मत मांडत असतो. ५०० व १००० च्या नोटांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचे त्याने स्वागत केले आहे. तो म्हणतो,‘देशात एकसूत्रीपणा आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मोदींनी उचलले आहे. पैशांचा योग्य वापराचे भविष्यातील फायदे आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील.’
Hoping we can all work in harmony to see out this change & it pays dividends to each & every citizen in the future. No more #BlackMoney !!!— Arjun Kapoor (@arjunk26) November 8, 2016
अनुष्का शर्मा :
सोशल मीडियावर स्वत:ची परखड मते मांडणारी अनुष्का शर्मा हिनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ट्विटरवर ती म्हणते,‘देशाच्या एकात्मतेसाठी मोदींनी उचललेले हे पाऊल अतिशय धाडसी आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी त्यांच्या या निर्णयाला पाठींबा द्यायला हवा.’
A welcome bold&courageous step by PM Modiji towards nation building.Each 1of us shld cooperate in d larger interest of d nation #BlackMoney— Anushka Sharma (@AnushkaSharma) November 8, 2016
सुनील शेट्टी :
बॉलिवूडचे सर्व कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव झाले असताना सुनील शेट्टी मागे कसा राहील? त्यानेही मोदींच्या निर्णयाचे आनंदाने स्वागत केलेय.‘११ नोव्हेंबर जेव्हाही येतो तेव्हा काही ना काही धमाका होतो. काळ्या पैशांविरोधात आत्तापर्यंत घेण्यात आलेला हा सर्वांत ‘बोल्ड अॅण्ड ब्रेव्ह’ निर्णय म्हणावा लागेल, असे ट्विट त्याने केलेयं.
9/11 jab bhi aata hai hila dalta hai bhai...this 9/11 some will lose...many shall win! A powerful & brave decision indeed #RIP#BlackMoney— Suniel Shetty (@SunielVShetty) November 8, 2016
मधुर भांडारकर :
‘चांदणी बार’,‘कॉर्पाेरेट’अशा उत्तम कथानकांवर आधारित चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर याने मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.‘नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. ५०० व १००० च्या नोटांना चलनातून बाद करण्याचा निर्णय अतिशय आक्रमक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी मोदींचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल, असे ट्विट त्याने केलेय.
Congratulations to @PMOIndia@narendramodi for this bold move to ban 500 and 1000 notes to counter #BlackMoney and strengthen our economy.— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) November 8, 2016
अभिषेक कपूर :
‘बी टाऊन’च्या बोटावर मोजता येण्याइतक्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे अभिषेक कपूर. ‘उडता पंजाब’,‘आॅल इज वेल’,‘फितूर’ यासारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले. सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा अभिषेक कपूर म्हणतो,‘मोदी प्लेड‘ट्रम्प्ड’कार्ड, पूरी इंडिया ‘हिलरी’ हैं.’
Modi played the TRUMP card
Poori India HILLARY hai #blackmoney#rs500#rs 1000 #pmooffice— Abhishek Kapoor (@Abhishekapoor) November 8, 2016
विवेक ओबेरॉय :
बॉलिवूडमधून आता जवळपास गायबच झालेला विवेक ओबेरॉय नोटांच्या मुद्यावर टिवटरवर चांगलाच अॅक्टिव्ह झाला. तो म्हणतो,‘अमेरिका मते मोजतीयेतर भारत नोटा मोजतेय.‘भ्रष्टाचारविरोधात मोदींचा मास्टरस्ट्रोक..’
America counting votes, India counting notes...masterstroke against corruption by @narendramodi#TransformingIndia#BlackMoney— Vivek Anand Oberoi (@vivek_oberoi) November 8, 2016