कोल्ड प्लेच्या निमित्ताने रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचा फॅशनचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 16:40 IST2016-11-21T16:37:16+5:302016-11-21T16:40:15+5:30
ग्लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हलमध्ये ब्रिटीश रॉक बँड कोल्ड प्ले आणि ख्रिस मार्टिनचाच बोलबाला पाहायला मिळाला. लोकमत मीडिया पार्टनर असलेल्या ...
.jpg)
कोल्ड प्लेच्या निमित्ताने रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचा फॅशनचा जलवा
ग लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हलमध्ये ब्रिटीश रॉक बँड कोल्ड प्ले आणि ख्रिस मार्टिनचाच बोलबाला पाहायला मिळाला. लोकमत मीडिया पार्टनर असलेल्या या फेस्टिव्हलला बॉलीवुडच्या तारे-तारकांचीही मांदियाळी पाहायला मिळाली. सा-यांच्या नजरा ख्रिसवर खिळल्या असताना आपल्या स्टाईल आणि रॉकिंग अंदाजाने बॉलीवुडच्या स्टार्सनीही कॅमे-याच्या लेन्सला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर जणू बॉलीवुडचं तारांगण अवतरलं होते. मौका भी है, दस्तुर भी है या उक्तीनुसार रेड कार्पेटवर या स्टार्सची अनोखी स्टाईल पाहायला मिळाली.
![Sonam Kapoor at Global Citizen Festival Redcarpet]()
कायमच आपल्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनम कपूर आकर्षक अशा लाल रंगाचा ड्रेस आणि गॉगल परिधान करुन रेड कार्पेटवर अवतरली. यावेळी सोनमची अदा आणि तिचं सौंदर्य घायाळ करणारे असेच होते.सोनाक्षी सिन्हा हिनेसुद्धा रॉकिंग अंदाजात एंट्री मारली. हिरव्या रंगाचे जॅकेट, ब्लॅक टॉप इनर आणि स्कर्ट अशा रफ एंट अंदाजात बॉलीवुडची दबंग गर्ल रेड कार्पेटवर आली आणि कॅमेरे तिच्या दिशेने वळले. मग काय सोनाक्षीनंसुद्धा ही संधी मिस केली नाही. कॅमे-यासमोर तिने एकाहून एक पोझ दिल्या. बिनधास्त, फायटर अशा सोनाक्षीच्या विविध अदांमधील पोझनं सा-यांना आकर्षित केलं.
![Vidya Balan and sonakshi sinha at Global citizent Festival Redcarpet]()
त्याचवेळी हिरव्या रंगाचा लांब कोट आणि पलाझो पँट परिधान करुन अभिनेत्री विद्या बालन रेड कार्पेटवर आली. विद्याचा हा अंदाज किती गोड दिसतोय हे सांगण्यासाठी त्यावेळी सोनाक्षीनं तिला कडकडून मिठीही मारली.
![Diya Mirza at Global citizent Festival Redcarpet]()
याशिवाय खास काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा तर बो असलेला पांढरा शर्ट आणि फ्लॉवर डिझाईन असलेला स्कर्ट परिधान करत रेड कार्पेटवर अवतरली होती.
![freida pinto Global Citizen Festival Redcarpet]()
अभिनेत्री फ्रिडा पिंटोनंही रेड कार्पेटवर कॅमे-यांना आकर्षित केलं. बॉलीवुडच्या अभिनेत्री रेड कार्पेटवर जलवा दाखवत असताना पुरुष मंडळीही काही मागे नव्हती.
![farhan akhtar at Global Citizen Festival]()
खास रॉक लिहिलेला आणि आपल्या इमेजला साजेसा टी-शर्ट घालून अभिनेता फरहान अख्तर रेड कार्पेटवर आला.
![Ayushman Khurana at Global Citizen Festival]()
अभिनेता आयुषमान खुराणा आणि अभिनेता विवेक ओबेरॉयचा आकर्षक सूट सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला.
![Vivek Oberoi at Global Citizen Festvial]()
कोल्ड प्लेच्या निमित्ताने रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचा हा फॅशनचा जलवा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
![Anupam Kher at Global Citizen Festvial]()