सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी CCTVला घेऊन झाला धक्कादायक खुलाासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 12:01 IST2020-06-26T12:01:20+5:302020-06-26T12:01:29+5:30

पोलिसांना त्याबद्दल अद्याप काही कळलेले नाही.

CCTV cameras was switched off when sushant sigh rajput did suicide | सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी CCTVला घेऊन झाला धक्कादायक खुलाासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी CCTVला घेऊन झाला धक्कादायक खुलाासा

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रोज नवे खुलासे होतायेत. पोलीस या प्रकरणी आपला तसाप करीत आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार सुशांत वांद्रे इथं ज्या अपार्टमेंटमध्ये राहायचा तिथले  सीसीटीव्ही कॅमेरा ऑन नव्हता. ज्या दिवशी या सुशांतने आत्महत्या केली त्या दिवशी सर्व कॅमेरे बंद होते. हे असे का होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या घराची डुप्लिकेट चावी गायब आहे. पोलिसांना त्याबद्दल अद्याप काही कळलेले  नाही.


 रिपोर्टनुसार, सुशांत आत्महत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे सुशांतने ज्या कपड्याने फाशी घेतली त्या कपड्यावर त्याच्या डाव्या हाताच्या बोटाचे ठसेच होते. पण सुशांत तर उजव्या हाताचा जास्त वापर करायचा. 


पोलिस या प्रकरणाचा तपास जलद गतीने करतायेत. पोलिसांचा तपास आता सुशांतच्या सोशल मीडियावर पोहोचला आहे. सुशांतने पोस्ट डिलीट केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ट्विटरला चिठ्ठी पाठवली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 22 लोकांचा जबाब नोंंदवला आहे. यात रिया चक्रवर्ती, सुशांतचे वडील आणि बहिणी, नोकर, मॅनेजर, मित्र यांचा समावेश आहे. . सुशांतच्या पोस्टमॉर्टमनुसार त्याच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: CCTV cameras was switched off when sushant sigh rajput did suicide