​कॅटची फोटोग्राफर्सला पुन्हा धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 20:14 IST2016-07-30T14:44:13+5:302016-07-30T20:14:13+5:30

बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ काहीच महिन्यांपूर्वी  मीडियावर जाम भडकली होती. रणबीरच्या ब्रेकअपनंतर कॅटरिना बेघर झाली होती. त्यामुळे मुंबईत ...

CAT photographers threaten again! | ​कॅटची फोटोग्राफर्सला पुन्हा धमकी!

​कॅटची फोटोग्राफर्सला पुन्हा धमकी!

लिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ काहीच महिन्यांपूर्वी  मीडियावर जाम भडकली होती. रणबीरच्या ब्रेकअपनंतर कॅटरिना बेघर झाली होती. त्यामुळे मुंबईत स्वत:साठी  घर शोधण्यासाठी निघाली असताना काही पत्रकारांनी कॅटरीनाचा पाठलाग केला होता. हे पाहून कॅटरीना चांगलीच संतापली होती. केवळ संतापलीच नाही तर पुन्हा पिच्छा पुरवाल तर पोलिसांत तक्रार करेल, अशी धमकीही तिने दिली होती. काल (शुक्रवारी) ‘बार बार देखो’ गर्ल पुन्हा एकदा पत्रकारांवर भडकताना दिसली. डान्स रिहर्सलसाठी कॅट कोरिओग्राफर गणेश आचार्य याच्या स्टुडिओमध्ये आली होती.  साहजिक कॅटची एक झलक कॅमेºयात कैद करण्यासाठी पापाराझी बराच वेळ स्टुडिओबाहेर ताटकळत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटची प्रकृती काहीशी बरी नव्हती. याही स्थितीत ती रिहर्सलसाठी स्टुडिओत आली होती. ती जशी स्टुडिओतून आपल्या कारकडे निघाली, पापाराझींनी तिचे फोटो काढायला एकच गर्दी केली. हे पाहून कॅटचा पारा पुन्हा चढला. तिने पुन्हा सर्व फोटोग्राफर्सला पोलिस तक्रार करण्याची धमकी देऊन टाकली. आता मीडियावर वारंवार धमकी देणे योग्य नाही, शेवटी हे कॅटला कोण समजवणार? नाही का?

Web Title: CAT photographers threaten again!