बिग बींसह दिसत असलेला हा चिमुकला कोण माहितीये का? एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आहे छत्तीसचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:51 PM2023-02-28T19:51:03+5:302023-02-28T19:52:50+5:30

Bollywood: या लहान मुलांपैकी एकाचा चेहरा अनेकांना ओळखीचा वाटत आहे. मात्र, तो नेमका कोण हे अचूकपणे सांगता येत नाहीये.

can you guess the celebrity who is sitting with amitabh bachchan in this picture | बिग बींसह दिसत असलेला हा चिमुकला कोण माहितीये का? एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आहे छत्तीसचा आकडा

बिग बींसह दिसत असलेला हा चिमुकला कोण माहितीये का? एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आहे छत्तीसचा आकडा

googlenewsNext

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे सहकलाकार असण्यासोबतच चांगले मित्रदेखील आहे. काही कलाकारांनी तर अगदी ब्लँक अँड व्हाइट जमान्यापासून सुरु झालेली मैत्री अद्यापही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर या कलाकारांचे जुने फोटो व्हायरल होत असतात. सध्या सोशल नेटवर्किंगवर अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका चित्रपटाच्या सेटवरचा असून त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

बिग बींच्या सध्याच्या घडीला प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे वरचेवर त्यांचे नवीन वा जुने फोटो व्हायरल होत असतात. यात सध्या त्यांचा १९७९ सालचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो महबूब स्टुडिओमधील असून त्यांच्यासोबत अन्य व्यक्तींसह तीन लहान मुलंदेखील दिसून येत आहेत. या तीन लहान मुलांपैकी एकाचा चेहरा अनेकांना ओळखीचा वाटत आहे. मात्र, तो नेमका कोण हे अचूकपणे सांगता येत नाहीये. त्यामुळेच हा लहानगा मुलगा कोण ते जाणून घेऊयात.

फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला मुलगा कोणी साधासुधा कलाकार नसून अभिनेता हृतिक रोशन(Hrithik roshan) आहे. हा फोटो हृतिकने बिग बींच्या वाढदिवशी सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरुनच त्यांचं कौटुंबिक नातं किती खास असल्याचं दिसून येतं.

दरम्यान, रोशन कुटुंबीय आणि बिग बी यांचे घरोब्याचे संबंध असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच या फोटोमध्ये हतिक बिग बींच्या बाजूला बसला आहे. हृतिक आजच्या घडीला त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतो. यात गेल्या काही काळापासून तो कथित प्रेयसी सबा आझाद आणि अभिनेत्री कंगना रणौतमुळे चर्चेत येत आहे. कंगना आणि हृतिकचा वाद साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे तो सातत्याने चर्चेत येत असतो.
 

Web Title: can you guess the celebrity who is sitting with amitabh bachchan in this picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.