"दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:50 PM2024-04-04T17:50:40+5:302024-04-04T17:54:34+5:30

जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी स्वतःचा उल्लेख शेक्सपियर करत आयुष्याचा खास धडा दिलाय

Calling himself 'Shakespeare', Jackie shroff taught life lessons | "दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा

"दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा

बॉलिवूडचे जग्गू दादा म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ सर्वांचे लाडके अभिनेते. गेली अनेक वर्ष जग्गूदादा प्रेक्षकांचं विविध सिनेमांच्या माध्यमातून मनोरंजन करत आहेच. जग्गूदादा ओटीटी माध्यमात सुद्धा वेगवेगळ्या कलाकृतींमधून भेटीला येत आहेत. जग्गूदादा कधी त्यांच्या खास रेसिपीमुळे तर कधी धमाल विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच जग्गूदादा शेक्सपियर झालेत. काय आहे ही नवी भानगड?

जग्गूदादा स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत आयुष्याचे विविध धडे चाहत्यांना देत आहेत. नुकतीच त्यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. जग्गूदादा लिहितात, "सॉंस लंबा ले और दिमाग में ऑक्सिजन भर, क्यूकी दिमाग में रहेगी शांती तभी आएगी क्रांती" असं लिहित 'जग्गू शेक्सपियर' असा स्वतःचा उल्लेख त्यांनी केलाय. याच नावाखाली जग्गूदादा आयुष्याचे धडे सर्वांना देत आहेत आणि विविध गोष्टींवर  भाष्य करत आहेत. 

जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'मस्त मे रहने का' सिनेमात त्यांनी अभिनय केला.  या सिनेमात त्यांच्यासोबत नीना गुप्ताही होत्या. हा सिनेमा प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज झाला. जॅकी श्रॉफ आता लवकरच वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' सिनेमात अभिनय करत आहेत. हा सिनेमा याचवर्षी पुढील काही दिवसांत रिलीज होईल.

Web Title: Calling himself 'Shakespeare', Jackie shroff taught life lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.