Nora Fatehi: पायातून रक्त, गळ्यालाही दुखापत...तरीही नोरानं पूर्ण केलं गाण्याचं शुटिंग, पाहा 'Kusu Kusu' गाण्याचा मेकिंग Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 02:37 PM2021-11-22T14:37:25+5:302021-11-22T14:38:07+5:30

Nora Fatehi kusu Kusu Song: बॉलीवूडमध्ये मेहनती कलाकारांमध्ये नोरा फतेहीचंही नाव घेतलं जातं. नोरा फतेहीच्या मनमोहक अदा आणि जबरदस्त नृत्यकलेसाठी ती ओळखली जाते.

bts video of kusu kusu song nora fatehi share her bad experience on set | Nora Fatehi: पायातून रक्त, गळ्यालाही दुखापत...तरीही नोरानं पूर्ण केलं गाण्याचं शुटिंग, पाहा 'Kusu Kusu' गाण्याचा मेकिंग Video

Nora Fatehi: पायातून रक्त, गळ्यालाही दुखापत...तरीही नोरानं पूर्ण केलं गाण्याचं शुटिंग, पाहा 'Kusu Kusu' गाण्याचा मेकिंग Video

googlenewsNext

Nora Fatehi kusu Kusu Song: बॉलीवूडमध्ये मेहनती कलाकारांमध्ये नोरा फतेहीचंही नाव घेतलं जातं. नोरा फतेहीच्या मनमोहक अदा आणि जबरदस्त नृत्यकलेसाठी ती ओळखली जाते. यासोबतच तिच्या फॅशनचेही अनेक चाहते आहेत. नोरानं नुकतंच 'कुसू कुसू' (Kusu Kusu) या तिच्या नव्या गाण्याचं शुटिंग पूर्ण केलं. 'दिलबर-दिलबर' सारखंच 'सत्यमेव जयते २' मधील हे गाणं देखील आता हिट झालं आहे. नोरा फतेहीचं गाणं असेल आणि ते हिट होणार नाही असं होणार नाही. यात तिची अप्रतिम नृत्यकला आणि मनमोहक अदा आपल्याला दिसत असल्या तरी त्यामागे तिची कठोर मेहनत देखील दडलेली असते. 'कुसू कुसू' गाण्यासाठी देखील नोरानं भरपूर मेहनत घेतली आहे. गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना नोराला दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. पण त्याचा बाऊ न करता तिनं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. 

'कुसू कुसू' गाणं प्रदर्शित झाल्यानंतर नोरा फतेहीनं या गाण्याच्या चित्रीकरणावेळीचे काही क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत गाण्याच्या चित्रीकरणावेळी भरजरी ड्रेसमुळे तिच्या गळ्यावर आलेले निशाण आणि दुखापतीचा तिनं उल्लेख केला आहे. कुसू कुसू गाण्याच्या चित्रीकरणासाठी नोरानं एक भरजरी ड्रेस परिधान केला होता आणि दुपट्टा तिच्या हाराशी बांधला गेला होता. चित्रीकरण करताना दुपट्टा नोराच्या गळात अडकला आणि तिच्या मानेला दुखापत झाली होती. दुपट्ट्याच्या गळ्याभोवती वेटोळे घेतल्यानं तिला श्वास घ्यायला त्रास होईल इतका घट्ट लपेटला गेला होता. तर गळ्यातील भरजरी हारामुळे खरचटल्याचे निशाण गळ्यावर उमटले होते. या गाण्याच्या चित्रीकरणाचा आजवरचा तिचा अनुभव अतिशय वाईट होता असं तिनं म्हटलं आहे. 

नोरानं तिच्या ड्रेसला मॅचिंग हायहिल्स देखील घातल्या होत्या. पण चित्रीकरणावेळी एक काच तिच्या पायात रुतली आणि रक्त वाहू लागलं होतं. गाण्याच्या मेकिंगच्या व्हिडिओमध्येही हे सगळं पाहायला मिळत आहे. पायातून रक्त वाहत असतानाही नोरानं शुटिंग न थांबवता पायाला पट्टी बांधून चित्रीकरण पूर्ण केलं होतं. पायाला जखम झालेली असूनही चेहऱ्यावर त्याचा कोणताही प्रभाव न ठेवता नोरानं गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. यासाठी तिचं कौतुक केलं जात आहे. 

Web Title: bts video of kusu kusu song nora fatehi share her bad experience on set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.