बहीण अंशुलाला ट्रोलर्सनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, संतापला अर्जुन कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 10:08 IST2018-11-28T10:06:58+5:302018-11-28T10:08:33+5:30

बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर हिला बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. जान्हवी कपूर हिने मंगळवारी एका इव्हेंटमध्ये हा धक्कादायक खुलासा केला.

brother arjun kapoor got angry with social media trolls who threatened his sister anshula kapoor to rape | बहीण अंशुलाला ट्रोलर्सनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, संतापला अर्जुन कपूर!!

बहीण अंशुलाला ट्रोलर्सनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, संतापला अर्जुन कपूर!!

ठळक मुद्देमाझ्या बहीणींना तुम्ही ज्या प्रकारच्या धमक्या देत आहाते, तशा धमक्या तुमच्या आया-बीहिणींना मिळू नयेत, अशी अपेक्षा करतो,’असे अर्जुन कपूरने लिहिले आहे.

बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर हिला बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. जान्हवी कपूर हिने मंगळवारी एका इव्हेंटमध्ये हा धक्कादायक खुलासा केला. आपली मोठी बहीण अंशुला हिचा ‘कॉफी विद करण 6’मुळे बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत, असे जान्हवीने सांगितले. अलीकडे जान्हवी व अर्जुन कपूर हे दोघे बहीण-भाऊ ‘कॉफी विद करण 6’मध्ये सहभागी झाले होते.

या शोमध्ये एक गेम जिंकण्यासाठी जान्हवीने मदतीसाठी अंशुलाला कॉल केला होता. पण अंशुला जान्हवीची मदत करण्यास असमर्थ ठरली होती. त्यामुळे अर्जुन कपूर या गेममध्ये विजयी झाला होता. हा एपिसोड प्रसारित झाला आणि या क्लीपवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अंशुलाने सिद्ध केले की, ती अर्जुन कपूरची बहीण आहे. तिच्या मनात जान्हवीबद्दल जराही प्रेम असते तर तिने तिची मदत केली असते, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. ही गोष्ट हळूहळू इतकी वाढली की, अंशुलाला बलात्काराच्या धमक्या मिळणे सुरू झाले.



अशा धमक्यानंतर कुठल्याही भावाचा पारा चढणारचं. अर्जुन कपूरचाही चढला. अंशुलाला धमक्या देणाऱ्या, तिला भले-बुरे म्हणणºयांवर अर्जुन अक्षरश: तुटून पडला. काल रात्री अर्जुनने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर आपला संताप व्यक्त केला. ‘कॉफी विद करणमध्ये जे काही झाले त्यात अंशुलाला गोवणे, तिला भले-बुरे म्हणणे चूक आहे. माझ्या बहीणीला ज्याप्रकारे लोक बोलत आहेत, त्यानंतर माझा संयम संपलाय. माझ्या बहीणीला त्रास देणा-या ट्रोलर्सला मी चॅलेंज देतो. माझ्या बहीणींना तुम्ही ज्या प्रकारच्या धमक्या देत आहाते, तशा धमक्या तुमच्या आया-बीहिणींना मिळू नयेत, अशी अपेक्षा करतो,’असे अर्जुन कपूरने लिहिले.
दरम्यान जान्हवी कपूरने ‘कॉफी विद करण 6’मध्ये जे काही झाले त्याच्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अंशुलाला मी मदतीसाठी कॉल केला. पण ती गोंधळली. काय उत्तर द्यावे हे तिला समजेना. त्यामुळे ती माझी मदत करू शकला नाही, असे जान्हवीने म्हटले आहे.

Web Title: brother arjun kapoor got angry with social media trolls who threatened his sister anshula kapoor to rape