Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:48 AM2022-09-19T11:48:30+5:302022-09-19T11:49:02+5:30

Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Brahmastra fame Ranbir Kapoor-Alia Bhatt spent time with bodyguard's family, photos surfaced | Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

googlenewsNext

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) सध्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे आणि चित्रपटानं जगभरात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. प्रेग्नेंट असूनही आलिया तिच्या ब्रह्मास्त्र आणि डार्लिंग चित्रपटाचे प्रमोशन करत होती. मात्र यावेळी तिचा बॉडीगार्ड युसूफ इब्राहिमनं तिला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली आहे. दरम्यान रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यावेळी त्यांनी फोटोदेखील काढले आहेत आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

युसूफ इब्राहिमनं इंस्टाग्रामवर त्याच्या पत्नी आणि मुलीनं आलिया भट आणि रणबीर कपूरसोबत काढलेले फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने हे फोटो शेअर करत फॅमिली अस्त्र असं कॅप्शन दिले होते. युसूफ आलियासोबत तिच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसतात.

मुंबईस्थित युसूफ इब्राहिम ९११ प्रोटेक्शन चालवतात जे अनेक सेलिब्रिटींना बॉडीगार्ड सेवा पुरवतात. खरेतर, याआधीदेखील तुम्ही बऱ्याच सेलिब्रेटींसोबतचे फोटो पाहिले असतील. यापूर्वी अभिनेत्री सनी लिओनी आणि तिची मुलगी निशा कौर वेबर युसूफला राखी बांधताना दिसली होती. अभिनेता वरुण धवनच्या नताशा दलालच्या लग्नातही त्यांची सिक्युरिटीची जबाबदारी उत्तमरित्या पेलली होती. 


ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि आलिया प्रेमात पडले. २०२२ मध्ये लग्नगाठ बांधण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे डेट केले. आता लवकरच त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे.

Web Title: Brahmastra fame Ranbir Kapoor-Alia Bhatt spent time with bodyguard's family, photos surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.