अजयच्या हिरोईनचा हा आहे बॉयफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 14:26 IST2016-10-26T14:25:41+5:302016-10-26T14:26:38+5:30

अभिनेता तथा दिग्दर्शक अजय देवगन याच्या आगामी ‘शिवाय’मध्ये लिड रोलमध्ये असलेल्या एरिका कार हिच्या भूमिकेविषयी सध्या चांगलीच उत्सुकता निर्माण ...

This is boyfriend of Ajay's heroin | अजयच्या हिरोईनचा हा आहे बॉयफ्रेंड

अजयच्या हिरोईनचा हा आहे बॉयफ्रेंड


/>अभिनेता तथा दिग्दर्शक अजय देवगन याच्या आगामी ‘शिवाय’मध्ये लिड रोलमध्ये असलेल्या एरिका कार हिच्या भूमिकेविषयी सध्या चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अजयसोबतचा तिचा स्मूचिंग चांगलाच गाजत असल्याने प्रेक्षक तिच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अर्थातच प्रेक्षकांच्या मनाला पहिला प्रश्न पडला असेल तो तिच्या बॉयफ्रेंडविषयीचा. याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. 
सध्या एरिका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिथे-जिथे जात आहे, त्या ठिकाणी तिचा बॉयफ्रेंड हमखास बघावयास मिळतो. होय, मार्चिन असे नाव असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडचीही चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. मात्र त्याची भूमिका अगोदरच निश्चित होती, असे अजिबात नाही. त्याचे झाले असे की, जेव्हा मसूरीमध्ये सर्व कलाकार बोनफायर खेळत होते तेव्हा अजय देवगनचे लक्ष मार्चिनवर गेले. अजयने मार्चिनला जवळ बोलावत म्हटले की, तू माझ्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहेस का? तर त्याने लगेचच होय, असे उत्तर दिले. अजयने लगेचच मार्चिनला स्क्रिप्ट वाचायला दिली. तसेच कॉस्ट्यूम टीमला त्याचा तातडीने कॉस्ट्यूमही बनवायला सांगितले. मार्चिननेदेखील मिळालेल्या संधीचे सोने करीत सीन चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. मार्चिनच्या भूमिकेमुळे एरिका भलतीच खुश आहे. सध्या ती ज्या-ज्या ठिकाणी प्रमोशनसाठी जात असते, त्या ठिकाणी मार्चिन तिच्यासोबत असतो. 
दोघांना वेळ मिळेल तेव्हा दोघेही एकमेकांशी गप्पा मारत असतात. दोघांमधील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. चित्रपटाविषयी काय बोलायला हवे, याबाबतच्या काही टीप्सही मार्चिन एरिकाला देत असतो. एरिकादेखील मार्चिनला संधी मिळेल तेव्हा लोकांसमोर प्रमोट करण्याचा प्रयत्न करीत असते. तसेच तिला मार्चिनबाबत विचारल्यास ती बिनधास्तपणे दोघांमधील नात्यावर उघडपणे बोलते. 

Web Title: This is boyfriend of Ajay's heroin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.