BOX OFFICE : सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने केला २०० कोटींचा टप्पा पार; चित्रपटाला जगभरात प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:15 IST2017-12-27T09:00:11+5:302017-12-27T15:15:23+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच धडक मारली आहे. केवळ चारच दिवसांत ...

BOX OFFICE: Salman Khan's 'Tiger Jinda Hai' crosses 200 crores; The movie responds worldwide! | BOX OFFICE : सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने केला २०० कोटींचा टप्पा पार; चित्रपटाला जगभरात प्रतिसाद!

BOX OFFICE : सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने केला २०० कोटींचा टप्पा पार; चित्रपटाला जगभरात प्रतिसाद!

लिवूडचा दबंग सलमान खान याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच धडक मारली आहे. केवळ चारच दिवसांत १५१.४७ कोटी रुपयांची कमाई करणाºया या चित्रपटाचा पाचव्या दिवशीही जोर कायम होता. पाचव्या दिवशी १८.५० कोटी रुपयांची कमाई करीत चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. भारताबरोबरच विदेशातही हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालण्यास यशस्वी ठरत असताना दिसत आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने सोमवारी यूएई, अमेरिका, कॅनडा, यूके आणि जगातील इतर भागांमध्ये ५४.७० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. त्यामुळे जगभरातील कमाईचा आकडा बघितल्यास आतापर्यंत या चित्रपटाने २२४.७६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर भारतात १६९.९७ कोटी रुपये कमाविले आहेत. 

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रिलिज झालेल्या या चित्रपटाने ३४.१० कोटी रुपयांची ओपनिंग केली. त्यानंतर शनिवारी कमाईत (३५.३० कोटी) वाढ होताना दिसली. रविवारी चित्रपटाने चांगलीच भरारी घेत ४५.५३ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. तर ख्रिसमसच्या दिवशी चित्रपटाची कमाई ३६.५४ कोटी रुपये होते. दरम्यान याच वर्षात ईदच्या पार्श्वभूमीवर रिलिज झालेल्या सलमानच्या ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाने प्रेक्षकांची पूर्ती निराशा केली होती. त्यामुळे ‘टायगर जिंदा है’कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. त्यानुसारच चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाई करीत असून, हा आकडा आता किती कोटी रुपयांपर्यंत जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, ‘टायगर जिंदा है’ हा सलमानच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाचा सीक्वल आहे.
 
‘एक था टायगर’चे संपूर्ण बजेट ७५ कोटी रुपये होते. तर सलमान खानच्या फीस सोडून ‘टायगर जिंदा है’चे बजेट १५० कोटी रुपये आहे. चौथ्या दिवशीच चित्रपटाने खर्च वसूल केल्याने आता समोर येणारे कमाईचे आकडे निव्वळ नफा आहे. त्यामुळे हा चित्रपट आणखी किती कोटी रुपयांपर्यंत मुसंडी मारतो यावरच चित्रपटाचे यश अवलंबून असणार आहे. दरम्यान हा चित्रपट हिट कॅटेगिरीमध्ये सहभागी झाला आहे. 

Web Title: BOX OFFICE: Salman Khan's 'Tiger Jinda Hai' crosses 200 crores; The movie responds worldwide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.