भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गाजतोय 'हा' देशभक्तीचा चित्रपट, तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:24 IST2025-05-09T11:03:43+5:302025-05-09T11:24:27+5:30
भारत-पाक युद्धावरचा चित्रपट आता OTT वर मोफत पाहू शकता. युट्यूबवरही उपलब्ध आहे.

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गाजतोय 'हा' देशभक्तीचा चित्रपट, तुम्ही पाहिला का?
India Pakistan War: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेमुळे वातावरण आणखीनच चिघळलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा सूर आणि युद्धातील वीरता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील युद्धावर आधारित एका चित्रपटाची सध्या चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमध्ये असे अनेक देशभक्तीपर चित्रपट बनले आहेत जे त्यांच्या कथांमुळे तुमचे डोळे ओले करु शकतात. असाच एक चित्रपट म्हणजे १९९७ मध्ये आलेला जे. पी. दत्ता यांचा 'बॉर्डर'. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही युद्धपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांसारख्या कलाकारांचा प्रभावी अभिनय आणि धगधगत्या संवादांनी 'बॉर्डर' आजही देशभक्तीचा उत्तम सिनेमा मानला जातो.
जर तुम्हालाही ‘बॉर्डर’ पुन्हा अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच YouTube वर देखील मोफत पाहता येतो. विशेष म्हणजे लवकरच याचा सिक्वेल 'बॉर्डर २' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॉर्डर' च्या सिक्वेलमध्ये सनी देओल पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार, यात शंका नाही. वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ या कलाकारांचा समावेश देखील 'बॉर्डर २' मध्ये आहे.