Boney Kapoor : जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 10:24 AM2022-11-03T10:24:52+5:302022-11-03T10:26:00+5:30

बोनी कपूर  (Boney Kapoor) यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जान्हवी कपूरला चित्रपट मिळवून देत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. पण बोनी कपूर यांनी मात्र एक वेगळाच खुलासा केला आहे...

boney kapoor told he invested lots of money on anil kapoor and sanjay kapoor | Boney Kapoor : जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, स्वत: केला खुलासा

Boney Kapoor : जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, स्वत: केला खुलासा

googlenewsNext

बोनी कपूर  (Boney Kapoor) यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जान्हवी कपूरला चित्रपट मिळवून देत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. पण बोनी कपूर यांनी मात्र एक वेगळाच खुलासा केला आहे. जान्हवी नाही तर दोन वेगळ्याच लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. जान्हवी (Janhvi Kapoor )आणि अर्जुन कपूरला ( Arjun Kapoor) त्यांनी लॉन्च केलं नाही.

 

‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरअर्जुन कपूरच्या सिनेमांवर पैसा का लावला नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘हा माझा निर्णय होता. मी माझ्या दोन्ही भावांना लॉन्च केलं.  आधी अनिल कपूरला  (Anil Kapoor) लॉन्च केलं आणि नंतर संजय कपूरला  (Sanjay Kapoor) लॉन्च केलं.  तेव्हा मला रोखणारं कोणी नव्हतं. मी साखरेत गूळ मिसळत होतो आणि मी साखरेत इतका गुळ मिसळला की डायबिटीजचा धोका निर्माण झाला. भावांना लॉन्च करताना मी कोणतीही कसर सोडली नाही. पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण जेव्हा माझ्या मुलांची वेळ आली, तेव्हा मात्र माझ्या अनुभवानुसार मी त्यांना लॉन्च न करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या मुलांना लॉन्च करणार नाही, असं मी ठरवलं. कुणीतरी त्यांना लॉन्च करेल आणि जेव्हा ते सेट होतील तेव्हा त्यांच्या मार्केट व्हॅल्यूनुसार त्यांच्यात पैसे गुंतवायचे असा निर्णय मी घेतला.’

 जान्हवीला बोनी कपूर यांनी लॉन्च केलं नाही. त्याचप्रमाणे अर्जुन कपूरला लॉन्च करणंही त्यांनी टाळलं. अर्जुनला यशराज प्रॉडक्शननं लॉन्च केलं. इशकजादे हा अर्जुन कपूरचा पहिला सिनेमा होता.  जान्हवीला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं लॉन्च केलं. धडक हा तिचा पहिला सिनेमा होता. लवकरच बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर हिचाही बॉलिवूड डेब्यू होतोय आणि ती सुद्धा जोया अख्तरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे.
  

Web Title: boney kapoor told he invested lots of money on anil kapoor and sanjay kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.