OMG! सलमानसोबतच्या नात्यावर बोनी कपूर यांचा खुलासा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 13:24 IST2020-02-16T13:23:34+5:302020-02-16T13:24:39+5:30

सलमानसोबत बिघडले बोनी कपूर यांचे संबंध, काय मलायका आहे कारण?

boney kapoor accepts strained relation with salman khan; is malaika arora the reason | OMG! सलमानसोबतच्या नात्यावर बोनी कपूर यांचा खुलासा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

OMG! सलमानसोबतच्या नात्यावर बोनी कपूर यांचा खुलासा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

ठळक मुद्दे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्यावर बोनी कपूर आणि अर्जुन कपूर यांचे सलमान खानशी असलेले मैत्रीचे संबंध बिघडले.

निर्माता बोनी कपूर याचे कुटुंबावरचे प्रेम ही नव्याने सांगण्यासारखी गोष्ट नाही. एका ताज्या मुलाखतीतही त्यांचे कुटुंबावरचे प्रेम स्पष्ट दिसले. अर्जुन कपूर, अंशुला, जान्हवी आणि खुशी या चारही मुलांबद्दल या मुलाखतीत ते भरभरून बोलले. पण याच मुलाखतीत त्यांनी असा काही खुलासा केला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
होय, सलमान खानसोबतच्या नात्याबद्दलही ते बोलले. सलमानसोबतचे आपले नाते आता पहिल्यासारखे राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

खरे तर  सलमान खान आणि बोनी कपूर एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांनी ‘वॉन्टेड’ आणि ‘नो एंट्री’सारखे हिट सिनेमे दिलेत. मात्र 2009 मध्ये ‘वॉन्टेड’नंतर दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही. मध्यंतरी सलमान व बोनी कपूर यांच्यात बिनसल्याच्या बातम्या आल्या खºया. पण बोनी कपूर यावर मौन बाळगून होते. पण ताज्या मुलाखतीत सलमान खानसोबत आपल्या बिघडलेल्या नातेसंबंधांवर बोनी कपूर पहिल्यांदाच बोलले. यावेळी त्यांनी  मलायकाचे नाव न घेता  तिच्यामुळेच हे संबंध बिघडल्याचेही मान्य केले.

‘अर्जुनला सुरुवातीपासूनच दिग्दर्शन करायचे होते. त्यामुळे त्याला अभिनेता म्हणून लॉन्च करण्याचा कोणताही प्लान मी कधीच केला नव्हता. पण एक दिवस मला सलमानने कॉल केला आणि एकदा तरी अर्जुनला अभिनयात स्वत:ला आजमावून पाहू द्या, असे तो मला म्हणाला. सलमानच्या सल्ल्यामुळेच मी अर्जुनला अभिनेता म्हणून पाहू शकलो. अर्जुनला अभिनेता म्हणून लॉन्च करण्यासाठी माझ्यापेक्षा सलमानने मेहनत घेतली होती. त्यानेच त्याला गाइड केले आणि त्यानेच त्याला ग्रुम केले. सलमानचे हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. पण दुर्दैवाने आता माझे आणि सलमानचे संबंध आधीसारखे राहिलेले नाहीत,’ असे बोनी कपूर यांनी या मुलाखतीत सांगितले. 

 बोनी कपूर यांनी स्पष्टपणे काही बोलले नसले तरीही त्यांच्या बोलण्याचा रोख मलायकाकडे होता हे स्पष्ट होते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्यावर बोनी कपूर आणि अर्जुन कपूर यांचे सलमान खानशी असलेले मैत्रीचे संबंध बिघडले. सुत्रांच्या माहितीनुसार अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळेच मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा संसार तुटला. 

Web Title: boney kapoor accepts strained relation with salman khan; is malaika arora the reason