बालपणी जान्हवी कपूरच्या पायांवरून खिल्ली उडवायचे बोनी कपूर, हे आहे यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:41 IST2019-02-01T19:41:26+5:302019-02-01T19:41:53+5:30

नेहा धुपियाचा चॅट शोमध्ये जान्हवी कपूरने बहिण खुशीसोबत सहभाग घेतला होता. यावेळी जान्हवीने बोनी कपूर बालपणी तिच्या पायांवरून खिल्ली उडवायचे याबाबतचा खुलासा केला.

Boney Kapoor is about to ridicule Jahnvi Kapoor's childhood, the reason behind this is | बालपणी जान्हवी कपूरच्या पायांवरून खिल्ली उडवायचे बोनी कपूर, हे आहे यामागचे कारण

बालपणी जान्हवी कपूरच्या पायांवरून खिल्ली उडवायचे बोनी कपूर, हे आहे यामागचे कारण

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जान्हवी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि जिममधील वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवी बहिण खुशीसोबत नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी बोनी कपूर तिच्या पायावरून तिला चिडवायचे , यामागचे कारण सांगितले. 
जान्हवी म्हणाली की, लहानपणी माझे वडील बोनी कपूर माझ्या पायांची खूप खिल्ली उडवायचे. ते बोलायचे की चिकन लेग्स. त्यामुळे मी माझ्या पायांवर खूप मेहनत घेतली. 
तिने नेहा धुपियाच्या शोमध्ये तिला मिळणाऱ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे खूप खूश असल्याचे सांगितले.


जान्हवी तख्त व गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. तख्तच्या चित्रीकरणाला खूप वेळ आहे. त्यामुळे जान्हवीने गुंजन सक्सेनाच्या बायोपिकवर काम करायला सुरूवात केली आहे.त्यात ती आयएएफ पायलट गुंजनच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी सध्या ती खूप प्रयत्न करते आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जान्हवी सहा ते सात किलो वजन वाढवणार आहे. या चित्रपटात जान्हवीला पाहणे कमालीचे ठरणार आहे

 

Web Title: Boney Kapoor is about to ridicule Jahnvi Kapoor's childhood, the reason behind this is