सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब असल्याची उडवली होती अफवा, पोलिसांनी सुरु केला तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:37 PM2020-06-18T19:37:54+5:302020-06-18T19:43:46+5:30

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Bomb threat at rajinikanth residence and police registered case | सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब असल्याची उडवली होती अफवा, पोलिसांनी सुरु केला तपास

सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब असल्याची उडवली होती अफवा, पोलिसांनी सुरु केला तपास

googlenewsNext

दक्षिण सिनेमातील सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. सकाळी 10.30 वाजता एका अनोख्या नंबरवरुन 108 एम्बुलेंस कंट्रोल रुममध्ये फोन आला आणि रजनीकांत यांच्या पोएस गार्डनवाल्या घरात बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या क्षणी फोन कट झाला. यानंतर पोलिस आणि बॉम्ब शोध पथक यांनी रजनीकांत यांच्या घराची झडती घेतली.  घरात बॉम्ब सापडला नाही तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

कोरोना व्हायरसमुळे रजनीकांत यांचं संपूर्ण कुटुंबीय घरातच होते त्यांनी पोलिसांना तपास करण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी आपल्या घरातील अधिकाऱ्यांना सूचना दिली घराची तपासणी करायला सांगितली. यात पोलिसांना 10 मिनिट वाट पहावी लागली. 
सुपरस्टार रजनीकांतच्या आधी सलमान खान, आलिया भट्ट सारख्या बॉलिवूड कलाकारांना घरात बॉम्ब मारण्याची धमकी मिळाली होती.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, रजनीकांत शेवटचे दरबार सिनेमात दिसले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत अभिनेत्री नयनतारा झळकली होती. 

Web Title: Bomb threat at rajinikanth residence and police registered case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.