खुशखबर! बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार, पण अंदाज असणार वेगळा

By अमित इंगोले | Updated: November 6, 2020 10:28 IST2020-11-06T10:27:51+5:302020-11-06T10:28:26+5:30

आता अशात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहरूख खानच्या आगामी सिनेमात सलमान खान दिसणार असल्याची चर्चा आहे. या बातमीने दोघांच्याही फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Bollywood's superstar Salman Khan and Shahrukh Khan will be back together but the style will be special | खुशखबर! बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार, पण अंदाज असणार वेगळा

खुशखबर! बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार, पण अंदाज असणार वेगळा

बॉलिवूड किंग खान शाहरूख खानचे फॅन्स त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहरूख लवकरच त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग करण्याची माहिती समोर आली होती. आता अशात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहरूख खानच्या आगामी सिनेमात सलमान खान दिसणार असल्याची चर्चा आहे. या बातमीने दोघांच्याही फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे.

शाहरूखने त्याच्या आगामी सिनेमाबाबत अजून काहीही अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. अशी चर्चा आहे की, त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमात जॉन अब्राहम व्हिलनची भूमिका साकारणार आहे. आणि यात दीपिका पादुकोण मुख्य अभिनेत्री असणार आहे. आता या सिनेमात सुपरस्टार सलमान खानही दिसणार असल्याचे समजते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान या सिनेमात एक पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. सलमान खानने शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तो शाहरूख खानसोबत या सिनेमातील एका गाण्यात डान्स करताना दिसला होता. 

दरम्यान एक दशकापासून दोघेही स्टार एकमेकांच्या सिनेमात कॅमिओ भूमिका साकारताना बघायला मिळत आहेत. सलमान खानने शाहरूखच्या 'कुछ कुछ होता है', 'ओम शांति ओम' सिनेमातही कॅमिओ भूमिका साकारली होती. तर शाहरूख सलमान खानच्या 'हर दिल जो प्यार करेगा', 'ट्यूबलाइट' सिनेमात कॅमिओ साकारताना दिसला होता. आता शाहरूख त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग लवकरच सुरू करणार असल्याचं समजतं. 
 

Web Title: Bollywood's superstar Salman Khan and Shahrukh Khan will be back together but the style will be special