/>cnxoldfiles/a>ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे कंगणा राणौत अभिनेत्री सतत लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी काही ना काही अॅक्टीव्हीटी करताना दिसतात. कधी त्या फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेतात तर कधी त्यांच्यावर चर्चा होतच रहावी यासाठी त्या सेक्सी फोटोशूट करत या चर्चांना नवीन वळण देण्याचा प्रयत्न करतात. कंगणा राणौतचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. त्यात तिचा सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोत तिचा लूक आणि बॉडी लँग्वेजमध्ये कमालीचा बदल जाणवत आहे.बॉलिवूडची या क्वीनने अनेक हिटवर हिट सिनेमा दिले असला तरी तिला अनेक अपयशाचाही सामना करावा लागला. क्रिश सिनेमात सुपरगर्ल कायाची भूमिका साकारल्यानंतर तिने रज्जो बनत तिने रूपेरी पडद्यावर एंट्री घेतली.मात्र या रज्जोच्या जुल्मी अदा रसिकांना घायाळ करतील अशी आशा तिला होती...मात्र घडलं काही उलटंच... ना रज्जोच्या जुल्मी अदांनी जादू केली... ना रसिकांना रज्जो भावली....असं असलं तरी एकामागून एक फ्लॉपचा सामना करणा-या कंगणानं रज्जोचं अपयशही पचवल्याचा दावा तिने त्यावेळी केला.शेवटी रसिकराजापुढं कोणाचं काय चालणार... त्यामुळंच की काय तिने स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आपले वेगवेगळे अंदाजातले फोटोशूट करत पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न केला.मात्र या फोटोशूटचा पब्लिसिटी इनकॅश करण्याचा फंडाही फेलच ठरला. त्याचवेळी चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात असणारी कंगणाला त्याचवेली मिलन ल्युथरियाने साथ दिली आणि कंगणाचा शोध 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' सिनेमावर येऊन थांबला….त्यानंतर थेट सुपरगर्ल बनलेली कंगणा बॉलिवूडची क्वीन बनत रसिकांवर अशी काय जादु करून गेली सगळेच तिच्या अभिनयाचे दिवाने बनले तिच्या कारकिर्दीने तिने गगनभरारी घ्यावी अशीच ईच्छा त्यावेळी सा-यांनीच व्यक्त केली होती.आता पुन्हा कंगणा राणी लक्ष्मीबाईं बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे.सध्या ती 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंग करते आहे.चित्रपटाच्या सेटवरून राणी लक्ष्मीबाईच्या पेहरावातील कंगनाचे काही फोटो लीक झाले आहे. त्यात कंगनाने साधी क्रिम कलरची साडी नेसली आहे. कपाळावर लाल टिकली आणि खांद्यावर चौकटीची शाल घेतलेली दिसत आहे. त्याच बरोबर भूमिकेनुसार तिच्या चेहऱ्यावर गंभीर एक्सप्रेशनसुद्धा दिसतायेत. ह्या फोटोंमध्ये ती सीन्सच्या आधीचे संवाद पाठ करताना दिसते आहे. या चित्रपटाची पटकथा बाहुबली फेम लेखक विजेंद्र प्रसाद आणि प्रसून जोशीने लिहिली आहे.जयपूरच्या अमर महलामध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. कंगणा राणौतव्यतिरिक्त यात अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे.