IFFI 2023: भाईजानला झालं काय? अचानक गर्दीमध्ये केलं महिलेला किस; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:09 AM2023-11-22T11:09:23+5:302023-11-22T11:09:54+5:30

Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

bollywood-tiger-3-star-salman-khan-kissing-woman-at-iffi-2023-video-goes-viral | IFFI 2023: भाईजानला झालं काय? अचानक गर्दीमध्ये केलं महिलेला किस; Video व्हायरल

IFFI 2023: भाईजानला झालं काय? अचानक गर्दीमध्ये केलं महिलेला किस; Video व्हायरल

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (salman khan) याचा टायगर ३ हा सिनेमा नुकताच दिवाळीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या तो चर्चेत येत  आहे. अलिकडेच तो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2023) मध्ये सहभागी झाला होता. यावेळी रेडकार्पेटवर सलमानचा स्वॅग चाहत्यांना पाहायला मिळाला. यामध्येच सध्या सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात भरगर्दीत त्याने एका महिलेला किस केलं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

या इव्हेंटमध्ये सलमानने एन्ट्री घेताच त्याच्या भोवती चाहत्यांनी मोठा गदारोळ केला. यामध्येच एका महिलेच्या जवळ सलमान गेला आणि तिच्या कपाळावर किस केलं. हा व्हिडीओ पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. साधारणपणे चाहते कलाकारांना भेटण्यासाठी धडपड करत असतात. परंतु, इथे सलमानच थेट चाहत्यांजवळ गेला.

कोण आहे ही महिला?

सलमानने किस केलेली महिला एक सीनिअर जर्नलिस्ट असून सलमानची ती चांगली मैत्रीण आहे.  त्यामुळेच सलमानने तिला पाहून किस केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

Web Title: bollywood-tiger-3-star-salman-khan-kissing-woman-at-iffi-2023-video-goes-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.