लंडनमध्ये पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; फॅन्सनी केले ढोल वाजवून दणदणीत स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 17:27 IST2019-08-04T17:26:54+5:302019-08-04T17:27:29+5:30
अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘८३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो अलीकडेच लंडनला गेला असता त्याच्या फॅन्सनी त्याचे ढोल वाजवून दणदणीत स्वागत केले. फॅन्सचे प्रेम पाहून तो देखील भारावून गेला. त्याने या स्वागताचा व्हिडीओ तसेच काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लंडनमध्ये पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; फॅन्सनी केले ढोल वाजवून दणदणीत स्वागत!
आपल्याला ठाऊक आहेच की, बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘८३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो अलीकडेच लंडनला गेला असता त्याच्या फॅन्सनी त्याचे ढोल वाजवून दणदणीत स्वागत केले. फॅन्सचे प्रेम पाहून तो देखील भारावून गेला. त्याने या स्वागताचा व्हिडीओ तसेच काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लंडन येथील साऊथहॉलमध्ये जाण्यासाठी रणवीर निघाला असता त्याला त्याच्या फॅन्सनी गाठले आणि मोठमोठे ढोल वाजवून त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करायला सुरूवात केली. तो येथे ‘८३’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. रणवीरने त्याच्या फॅन्ससोबत भरपूर फोटोज, सेल्फीज, व्हिडीओ काढले. तसेच सगळयांची भेट घेतली. फॅन्सच्या प्रेमाचा स्विकार केला. त्यांच्याशी हात मिळवत गप्पा देखील मारल्या.
यावेळी एका वयस्कर महिलेला तो भेटला. तिच्यासोबत थोडासा डान्स करतानाही दिसला.
रणवीर सिंग एक अभिनेता म्हणून तर ग्रेट आहेच पण त्याशिवायही तो फॅन्सचा खूप लाडका आहे. त्याला प्रत्येक क्षण एन्जॉय करायला आवडते. त्यासोबतच तो त्याला मिळालेल्या भूमिकेकवरही प्रचंड मेहनत घेताना दिसतो. तो त्याला मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचा प्रचंड अभ्यास करतो. त्याची पत्नी दीपिका पादुकोण ही देखील त्याला कायम त्याच्या कामाबद्दल प्रोत्साहन देत असते.