बॉलीवूड स्टार्सना आहेत ‘या’ वस्तूंचे वेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:57 IST2017-02-04T11:27:53+5:302017-02-04T16:57:53+5:30

भारतात दोनच गोष्टींचे प्रचंड वेड आहे. एक म्हणजे चित्रपट आणि दुसरे म्हणजे क्रिकेट. त्यातही चित्रपट आणि सिलेब्रिटींविषयी असणारे वेड ...

Bollywood stars are 'crazy things'! | बॉलीवूड स्टार्सना आहेत ‘या’ वस्तूंचे वेड!

बॉलीवूड स्टार्सना आहेत ‘या’ वस्तूंचे वेड!

रतात दोनच गोष्टींचे प्रचंड वेड आहे. एक म्हणजे चित्रपट आणि दुसरे म्हणजे क्रिकेट. त्यातही चित्रपट आणि सिलेब्रिटींविषयी असणारे वेड तर एका वेगळ्याच पातळीवर असते. बरं जसे सामान्य माणसांना आपल्या आवडीच्या कलाकारांविषयी वेड असते तसेच काहीसे वेड या सिलेब्रिटींनासुद्धा असते. प्रत्येक स्टार्सची आपली एक वेगळी तºहा आहे. कोणाला बुटांचे वेड आहे तर कोणाला घड्याळींचे, कोणाला कारचे आॅब्सेशन आहे तर कोणाला मोटरबाईकचे. अशाच काही निवडक स्टार्सच्या ‘वेडेपणा’विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘या’ वस्तू अशा आहेत ज्याशिवाय तुमच्या-आमच्या आवडीत्या सिलेब्रिटींचा दिवस पूर्ण होत नाही. चला तर मग जाणून घेऊया...

१. प्रियांका चोप्रा - फुटवेअर

‘देसी गर्ल’ प्रियांकाला कशाचे वेड आहे तर म्हणे चप्पलांचे. अभिनेत्रींनी हाय हिल्स वापरणे म्हणजे अनिवार्यच असल्यासारखे आहे. आपल्या दिसण्याकडे बारीक लक्ष ठेवणारी प्रियांका योग्य ती चप्पल किंवा शूज निवडण्यावर अधिक भर देते. जगभरातील सर्व आघाडीच्या व महागड्या ब्रँडच्या फुटवेअरचे तिच्याकडे प्रचंड कलेक्शन आहे.

२. विद्या बालन - साडी

विद्या बालन जणू काही साडी या वस्त्राची ‘अ‍ॅम्बेसिडर’च आहे. वेस्टर्न कपड्यांची बॉलीवूडमध्ये रेलचेल दिसत असताना विद्या मोठ्या अभिमाने आणि फार सुंदररीत्या साडी घालून वावरताना दिसते. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती साडी घालूनच हजेरी लावते. तिच्याकडे हजारो साड्यांचे अफाट कलेक्शन आहे. तिची आवड पाहता ते योग्यसुद्धा आहे.

३. शाहरुख खान - निळी जीन्स

SRk


‘किंग खान’ शाहरुखला कशाची कमी असेल? मोठ मोठे ब्रँड खास त्याच्यासाठी डिझायनर कपडे बनवत असतील एवढी त्याची चलती आहे. पण जेव्हा स्वत:साठी कपडे घेण्याची वेळ येते तेव्हा शाहरुख फक्त निळी जीन्स घेणे पसंत करतो. असे म्हटले जाते की, त्याच्याकडे दीड हजारांपेखा जास्त निळ्या डेनिम जीन्स पँट्स आहेत.

४. कंगना राणौत - टॅटू

बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगनाला टॅटूचे प्रचंड वेड आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर तिने तलवार, क्रॉस, पंख, एंजल असे विविध टॅटू गोंदवून घेतलेले आहे. लूकसाठी प्रयोगशील असणाऱ्या कंगणाला टॅटू सर्वात जास्त आवडतात.

५. जॉन अब्राहम - सुपरबाईक
जॉनची आवड जगापासून काही लपलेली नाही. त्याला ‘सुपरबाईक’चे वेडं आहे. ‘हँडसम हंक’ जॉनला सुपरफास्ट आणि स्टायलिश स्पोर्ट्स बाईक आवडते. आता त्याच्यासारख्या स्टारला असा ‘शौक’ बाळगणे परवडण्यासारखेसुद्धा आहे.

६. सोनम कपूर - ब्रँडेड कपडे व अ‍ॅक्सेसरी
बॉलीवूड ‘फॅशन डिवा’ सोनम कपूर तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ‘फॅशन’च्या दुनियेतील कोणतही गोष्ट सोनमच्या ‘विश लिस्ट’मध्ये असते. म्हणून तर तिच्याकडे नावाजलेल्या सर्व ब्रँडसचे कपडे आणि अ‍ॅक्सेसरी आहेत. शिवाय तिच्याकडे पाहून तिचे हे वेडं तिच्यासाठी लाभदायक ठरतेय असेच म्हणावे लागेल.

७. बिपाशा बसू - घड्याळ
या ‘बंगाली ब्युटी’ला मनगटावरील घड्याळीचे वेड आहे. बिपाशाकडे घड्याळांचे मोठे कलेक्शन असून प्रसंगानुरूप ती घडी घालणे पसंत करते. घडी घालणारे लोकांची पर्सनालिटीसुद्धा इतरांपेक्षा वेगळी असते. बिपाशा हा निष्कर्ष खरा ठरवते.

८. अमिषा पटेल - हँडबॅग
अमिषा जरी मोठ्या पडद्यावरून गायब असली तरी तिचे ‘हँडबॅग’ सर्वश्रुत आहे. प्रत्येक ब्रँडची आणि वेगवेगळ्या साईज आणि रंगात तिच्याकडे हँडबॅग्स आहेत. कोणत्याही मुलीला हेवा वाटावा असे तिचे हँडबॅग कलेक्शन आहे.

९. सलमाना खान - परफ्युम
‘दबंग’ सलमान खानला परफ्युम आणि सोप्सचे खूप वेडं आहे. आता सलमानच्या चाहत्यांना त्याची ही आवड जरा विचित्र वाटू शकते मात्र, ‘सल्लूमिया परफ्युम के दीवाने है’.  बॉलीवूडचा भाईजान सलमान देशाविदेशात गेल्यावर सर्वात आधी परफ्युम विकत घेतो. आता एवढा मोठा स्टार म्हटल्यावर त्याला जे पाहिजे ते तो करू शकतो.

Web Title: Bollywood stars are 'crazy things'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.