लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 15:43 IST2020-12-18T11:27:36+5:302020-12-18T15:43:32+5:30

नेहाच्या या फोटोमुळे आणि या फोटोसोबत तिने आणि तिच्या नवऱ्याने लिहिलेल्या कमेंटमुळे ती प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Bollywood singer Neha Kakkar, Rohanpreet Singh Announce Pregnancy? | लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचं ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न झालं. नेहाच्या लग्नाची चर्चा सोशल मीडिया आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चांगलीच रंगली होती. लग्नापासून ते हनीमूनपर्यंतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रोहनप्रीत आणि नेहाची जोडी तिच्या फॅन्सना चांगलीच आवडली. पण आता नेहाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेहाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यात आपल्याला तिचा बेबी बम्ब पाहायला मिळत आहे. 

नेहाच्या या फोटोमुळे आणि या फोटोसोबत तिने आणि तिच्या नवऱ्याने लिहिलेल्या कमेंटमुळे ती प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेहाने या फोटोसोबत खयाल रख्या कर... (काळजी घेत जा...) असे लिहिले आहे तर रोहनप्रीतने अब तो कुछ ज्यादा ही ख्याल रखना पडेगा नेहू (आता तर खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार नेहू) अशी कमेंट लिहिली आहे. त्यामुळे नेहाकडे गुड न्यूज तर नाही ना असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. सोशल मीडियावर नेहाच्या गुड न्यूजची चर्चा रंगली असली तरी नेहा आणि रोहन प्रीतने त्यांच्याकडे नवा पाहुणा येणार आहे का या चर्चेवर मौन राखणेच पसंत केले आहे. नेहा खरंच गरोदर आहे की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे अशी चर्चा देखील रंगली आहे. 

नेहा आणि रोहन प्रीतने कोणत्या जाहिरातीसाठी फोटोशूट केले आहे की नेहू द्या व्याह या गाण्याच्या संबंधित हे फोटोशूट आहे अशी चर्चा नेहाच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. नेहाकडे खरंच गुड न्यूज आहे की नाही हे नेहा चाहत्यांना कधी सांगतेय याची वाट तिचे चाहते आतुरतेने पाहात आहेत.   

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले. रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदित वधू नेहा कक्करचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात नेहा आणि रोहनप्रीत ढोलच्या तालावर थिरकताना दिसले होते.

Web Title: Bollywood singer Neha Kakkar, Rohanpreet Singh Announce Pregnancy?