"अचानक श्वास घेण्यास त्रास होतो अन्...", बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक 'या' गंभीर आजाराशी करतोय सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:02 IST2025-08-29T10:57:23+5:302025-08-29T11:02:22+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक 'या'गंभीर आजाराशी करतोय सामना; वेळीच उपचार न घेतल्यास आयुष्यभराचा धोका, जाणून घ्या याबद्दल 

bollywood singer bigg boss 19 fame amaal mallik suffering from sleep apnea | "अचानक श्वास घेण्यास त्रास होतो अन्...", बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक 'या' गंभीर आजाराशी करतोय सामना

"अचानक श्वास घेण्यास त्रास होतो अन्...", बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक 'या' गंभीर आजाराशी करतोय सामना

Amaal Malik: 'बिग बॉस १९' च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या शोमध्ये अनेक कलाकार, गायक आणि इन्फ्ल्यूएन्सर देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, या पर्वात बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, संगीतकार अमाल मलिकने देखील एन्ट्री घेतली आहे.आपल्याने हटके स्टाईलने त्याने  प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.पण, अलिकडेच बिग बॉसच्या घरामध्ये त्याने त्याच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर खुलासा केला, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. 

अमाल मलिक हा एक यशस्वी संगीतकार आहे. तो त्याच्या लोकप्रिय गाण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक युष्यामुळेही चर्चेत असतो.अलिकेच अमाल बिग बॉस च्या शोमध्ये 
तो दररोज रात्री मशीन वापरून झोपतो लोकांमध्ये चर्चा सुरू झाली.याबद्दल अमालने खुलासा करत म्हटलं, त्याला स्लीप एपनिया नावाच्या आजाराने त्रस्त आहे.
ज्यामध्ये झोपेत असताना व्यक्तीचा श्वास काही सेकंदांसाठी थांबतो. आजारामुळे, अमलला अनेकदा घोरण्याची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे अमाल कायम त्याच्यासोबत CPAP मशीन (कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर)ठेवतो, असंही त्याने सांगितलं. 

अमाल मलिक करतोय गंभीर आजाराचा  सामना

बिग बॉसच्या शोमध्ये या आजारपणाबद्दल बोलताना तो म्हणाला,"मी एका मिनिटात १५-२० सेकंद श्वास घेऊ शकत नाही. मला गुदमरल्यासारखं वाटतं.मला झोप येत नाही आणि मी जोरात घोरतो,ज्यामुळे त्याचा इतरांनाही त्रास होऊ शकतो."त्यानंतर अमालने डिप्रेशनबद्दलही खुलेपणाने भाष्य केलं, मागील बऱ्याच काळापासून तो डिप्रेशनचा सामना करतो आहे, असं तो म्हणाला. 

स्लीप एपनिया म्हणजे काय?

स्लीप एपनिया एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. स्लीप एपनियामुळे आपण काही सेकंद श्वास घेऊ शकत नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, रात्री झोपेच्या दरम्यान श्वसनक्रियेत अनेकदा अडथळा उद्भवू शकतो. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि झोप मोड होते. ज्यामुळे निद्रानाशाची शक्यता असते. सकाळी डोके दुखणे, थकवा, मूड स्विंग आणि नैराश्य ही स्लीप एपनियाची लक्षणे आहेत.

Web Title: bollywood singer bigg boss 19 fame amaal mallik suffering from sleep apnea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.