"कॉपी केलेल्या गोष्टींना...", अभिजीत भट्टाचार्य यांनी 'चुनरी चुनरी' गाण्याच्या रिमेकवर व्यक्त केली नाराजी? म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:16 IST2025-05-27T11:10:37+5:302025-05-27T11:16:25+5:30

अलिकडेच जुन्या सुपरहिट गाण्यांच्या रिमेकचा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.

bollywood singer abhijeet bhattacharya talk about chunari chunari song remake in varun dhawan movie hai jawani toh ishq hona hai says | "कॉपी केलेल्या गोष्टींना...", अभिजीत भट्टाचार्य यांनी 'चुनरी चुनरी' गाण्याच्या रिमेकवर व्यक्त केली नाराजी? म्हणाले...

"कॉपी केलेल्या गोष्टींना...", अभिजीत भट्टाचार्य यांनी 'चुनरी चुनरी' गाण्याच्या रिमेकवर व्यक्त केली नाराजी? म्हणाले...

Abhijeet Bhattacharya : अलिकडेच जुन्या सुपरहिट गाण्यांच्या रिमेकचा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांची सुद्धा पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान, वरुण धवनच्या (Varun Dhawan) आगामी 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात या सुपरहिट गाण्याचा रिमेक करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच चित्रपटातील या गाण्याच्या शूटिंगचे  व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून  लोकांनी यामुळे जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली. मुळात हे गाणं अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी गायलं आहे. त्यावर आता अभिजीत भट्टाचार्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलिकडेच अभिजीत भट्टाचार्य यांना या चित्रपटातील 'चुनरी चुनरी' गाण्याच्या रिमेकबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी त्यांना गाण्याच्या रिमेकबद्दल कोणतीही कल्पना दिली नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यासंदर्भात 'हिंदुस्तान टाईम्स'शी बोलताना ते म्हणाले, "मला अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही. शिवाय अशा प्रकरणांमध्ये मला जास्त रुची नसते. बाजारात मूळ प्रतींपेक्षा कॉपी केलेल्या प्रतींना मागणी जास्त असते. त्याचं मूल्य फक्त काही लोकांनाच कळते. मूळ गोष्टीचं महत्त्व फक्त ठराविक लोकांना समजते. त्यामुळे मी अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकत नाही."

त्यानंतर पुढे अभिजीत भट्टाचार्य म्हणाले,"चुनरी चुनरी' हे एक उत्तम गाणं होतं. पण, ते खूपच घाईमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं. पण, आजही या गाण्याची लोकांमध्ये क्रेझ आहे." असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: bollywood singer abhijeet bhattacharya talk about chunari chunari song remake in varun dhawan movie hai jawani toh ishq hona hai says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.