वर्षा अखेरीस 'या' सेक्सी अभिनेत्रीने शेअर केला डेविल लूक, अवघ्या काही तासांत मिळाले 4 लाख व्ह्युज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 18:36 IST2019-12-31T18:36:04+5:302019-12-31T18:36:19+5:30
नेहमीप्रमाणे बोल्ड लूक नसला तरी तिच्या अतरंगी लूकने सा-यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत हुडी घातलेली डेविल लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

वर्षा अखेरीस 'या' सेक्सी अभिनेत्रीने शेअर केला डेविल लूक, अवघ्या काही तासांत मिळाले 4 लाख व्ह्युज
‘बागी २’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा आणि टायगरची केमिस्टी असलेल्या ‘बागी २’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हापासून दिशाच्या फॅनफॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. इतकंच नाही तर आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन सतत काही ना काही पोस्ट करणारी दिशा कायमच चर्चेत असते. काही वेळापूर्वी पोस्ट केलेला फोटो 4 लाखांहूनही अधिक लोकांनी पाहिला. या फोटोत नेहमीप्रमाणे बोल्ड लूकनसला तरी तिच्या अतरंगी लूकने सा-यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत हुडी घातलेली डेविल लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
2020 मध्ये दिशा अनेक सिनेमांत झळकणार असल्याची चर्चा असून यात मलंग हा सिनेमा आघाडीवर आहे. आदित्य रॉय कपूरसह ती पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटासाठी अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्स शूट केला जो जवळपास 1 मिनिटांचा होता. या चित्रपटात प्रेक्षकांना त्या दोघांचा रोमँटिक अंदाज अनुभवायला मिळणार आहे. अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्ससाठी दिग्दर्शक मोहित सूरीने शूटिंगच्या आधी दोघांना प्रीपरेशनसाठी वेळ दिला होता.
या सीक्वेन्समध्ये कमीत कमी एक मिनिटांसाठी पाण्याखाली राहण्याची गरज होती. श्वास रोखून पाण्याखाली राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. या सीक्वेन्सचं शूटिंग एक दिवस गोव्यात करण्यात आलं. दिशा व आदित्य व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर व कुणाल खेमू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 14 फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.