'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:24 PM2022-06-21T17:24:26+5:302022-06-21T17:24:36+5:30

Samantha ruth prabhu:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताची चर्चा रंगली आहे. ही जोडी एमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

bollywood samantha ruth prabhu give befitting reply on ex husband naga chaitanya and sobhita dhulipala affair | 'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया

'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया

googlenewsNext

एकेकाळी दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरहिट जोडी म्हणून समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) आणि नागा चैतन्यकडे (naga chaitanya) पाहिलं जायचं.  परंतु, अवघ्या ४ वर्षांमध्ये त्यांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. नागा चैतन्य आणि समंथा यांचा घटस्फोट सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरला. यानंतर दोघांच्याही अफेअर्सच्या चर्चाही रंगल्या. सध्या नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी समंथाने तिचं मत मांडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताची चर्चा रंगली आहे. ही जोडी एमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर या दोघांच्या अफेअरची अफवा समंथाच्या पीआर टीमने उठवल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळेच या प्रकरणी समंथाने आता तिचं मौन सोडलं आहे.

काय म्हणाली समंथा?

समंथाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. "जर एखाद्या मुलीविषयी अफवा पसरली तर ती खरी ठरु शकते. पण, जर एखाद्या मुलाविषयी अफवा पसरली तर ती अफवा एखाद्या मुलीने पसरवली असं म्हटलं जातं. तुम्ही सगळे जरा मोठे व्हा. जे कोणी नात्यात होते ते सहाजिकचं त्यांच्या नात्यात पुढे गेले आहेत. त्यांमुळे तुम्हालाही पुढे जायची गरज आहे. जरा तुमच्या कामावर आणि कुटुंबाकडे लक्ष द्या", असं ट्विट समंथाने केलं आहे.

दरम्यान, अलिकडेच नागा चैतन्य आणि शोभिता यांना नव्या घरात एकत्र पाहण्यात आलं तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. इतकंच नाही तर अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं.
 

Web Title: bollywood samantha ruth prabhu give befitting reply on ex husband naga chaitanya and sobhita dhulipala affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.