बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 07:09 PM2020-04-19T19:09:55+5:302020-04-19T19:11:06+5:30

इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासून टाइमपास करत आहेत. तसेच घरची कामे, योगा, गार्डनिंग करून मन रमवताना दिसत आहेत. कायम बिझी असणारे हे सेलिब्रिटी आता स्वत:साठी वेळ काढू शकत आहेत. त्यांनी केलेल्या कामांचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर क रत आहेत.

Bollywood 's' hot actress' photo goes viral; Share from Fanpage! | बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर!

बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर!

googlenewsNext

सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वजण क्वारंटाईन झाले आहेत. इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासून टाइमपास करत आहेत. तसेच घरची कामे, योगा, गार्डनिंग करून मन रमवताना दिसत आहेत. कायम बिझी असणारे हे सेलिब्रिटी आता स्वत:साठी वेळ काढू शकत आहेत. त्यांनी केलेल्या कामांचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच बॉलिवूडच्या एका हॉट अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो तिच्या फॅनपेजवरून व्हायरल झाल्याचे समजतेय. कोण आहे ती अभिनेत्री? बघा ओळखू येतेय का ते...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक चिमुकली गोड हसताना दिसत आहे. सध्या या फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये दिसणारी ही गोड मुलगी सध्या बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती आता जेवढी सुंदर तेवढीच ती बालपणीही गोड आणि निरागस दिसायची. ही आहे सर्वांची लाडकी अभिनेत्री दीपिका पदुकोण. तिचा हा फोटो तिच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

बालपणीच्या या फोटोमध्ये दीपिका खूपच क्यूट दिसत आहे. सध्या दीपिका रणवीर सोबत मुंबईमध्ये असून लॉकडाऊनध्ये ती तिच्या आई-बाबांना खूप मिस करत आहे. त्यामुळे हे सर्व संपल्यावर ती सर्वात आधी आपल्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. त्यानंतर ती शगुन बात्राच्या सिनेमा 'इंटर्न'च्या तयारीला सुरुवात करेल. हा 2015 मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या 'इंटर्न' सिनेमाचा हिंदी रिमेक असून यात दीपिकासोबत ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

Web Title: Bollywood 's' hot actress' photo goes viral; Share from Fanpage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.