Raid 2: अजय देवगण-रितेश देशमुखच्या सिनेमाची जबरदस्त कामगिरी, दुसऱ्या दिवशी कमाईत घसघशीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:12 IST2025-05-03T11:07:11+5:302025-05-03T11:12:59+5:30
बॉक्स ऑफिसवर फक्त 'रेड-२' चा डंका; दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

Raid 2: अजय देवगण-रितेश देशमुखच्या सिनेमाची जबरदस्त कामगिरी, दुसऱ्या दिवशी कमाईत घसघशीत वाढ
Raid 2 Box Office Collection Day 2: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) प्रमुख भूमिका असलेला 'रेड-२' हा चित्रपट १ मे च्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वी चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चांगली चर्चा होती. शिवाय अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सुद्धा या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती. त्यामुळे रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ग्रॅंड ओपनिंग केली. त्यानंतर आता रेड-२ चं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे.
प्रदर्शनाच्या दोन दिवसांनंतर रेड-२ ने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला. राज गुप्ता दिग्दर्शित रेड- २ चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाचा सीक्वल आहे. या फ्रॅंचाईजीचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळताना दिसते आहे. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात. जवळपास ४८ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १९.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी 'रेड-२' चित्रपटाने ११.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाचं एकून कलेक्शन ३१ कोटी इतकं झालं आहे.
'रेड -२' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. अजय देवगण, रितेश देशमुख तसेच वाणी कपूर, सौरभ शुक्ला यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त आहे. अजय देवगण या चित्रपटामध्ये अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे.