कुठे आहे 'निकाह' फेम अभिनेत्री सलमा आगा? बॉलिवूडपासून दूर राहून जपतेय तिचं पॅशन  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 02:44 PM2024-02-10T14:44:50+5:302024-02-10T14:48:30+5:30

'दिल के अरमां आसुओं में बह गए...'  म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी गायिका आणि बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे सलमा आगा.

bollywood nikah fame actress salma agha first choice for raj kapoor heena film know about her | कुठे आहे 'निकाह' फेम अभिनेत्री सलमा आगा? बॉलिवूडपासून दूर राहून जपतेय तिचं पॅशन  

कुठे आहे 'निकाह' फेम अभिनेत्री सलमा आगा? बॉलिवूडपासून दूर राहून जपतेय तिचं पॅशन  

Salma Agha : ८०-९० च्या दशकात आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे सलमा आगा. १९८२ मध्ये राज बब्बर दिग्दर्शित 'निकाह' या सिनेमातून त्यांनी रातोरात लोकप्रियता मिळवली. या सिनेमानंतर त्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकल्या. मात्र, सध्या त्या काय करतात, कशा दिसतात असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. मात्र, सलमा आगा यांचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला असून सध्या त्या त्यांची आवड जपत आहेत.

निकाह या सिनेमामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या सलमा आगा या राज कपूर यांच्या हिना या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणार होत्या. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. परंतु, त्यानंतर 'कसम पैदा करने वाले', 'सलमा', 'मीत मेरे मन के', 'जंगल की बेटी', 'हम और तुम', 'ताकत का तूफान' असे दमदार सिनेमा त्यांनी इंडस्ट्रीला दिले.

गाण्याची प्रचंड आवड :

सलमा आगा या बालवयात असताना त्यांच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यायच्या. त्यातूनच त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. उत्तम अभिनयाबरोबर सलमा आगा यांना गायकीचीही प्रचंड आवड आहे. 'निकाह' मधील 'दिल के अरमां आंसुओं में बह गए' हे त्यांच्या आवाजातील गाणं आजही तितकंच फेमस आहे.

६९ वर्षीय अभिनेत्री सलमा आगा आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात तर त्यांचे पती मंदर शाह दुबईत राहतात. सध्या अभिनेत्री अभिनय सोडून चित्रपट बनवते. शिवाय सलमा आगा त्यांचे गायनाचे पॅशनही जपत आहेत. 

Web Title: bollywood nikah fame actress salma agha first choice for raj kapoor heena film know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.