इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून लाखो रुपये कमावते Malaika Arora; जाणून घ्या, तिची वर्षाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:43 IST2022-07-20T18:42:36+5:302022-07-20T18:43:19+5:30
मलायका अरोराच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करते. विशेषतः इन्स्टाग्रामवर प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी मलायका लाखो रुपये घेते.

इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून लाखो रुपये कमावते Malaika Arora; जाणून घ्या, तिची वर्षाची कमाई
अभिनेत्री मलायका अरोरालाबॉलिवूडची फॅशन दिवाही म्हटले जाते. तिची लोकप्रियता कोणत्याही शीर्ष अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. यामुळेच मलायका इंस्टाग्रामवरील प्रत्येक पोस्टमधून लाखो रुपयांची कमाई करते. खरे तर, मलायका अरोरा ना चित्रपटात काम करते ना ती कॅमेऱ्यामागे एखादी भूमिका करताना दिसते. मात्र, असे असतानाही तिची पॉप्युलॅरीटी जबरदस्त आहे.
मलायका अरोराच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करते. विशेषतः इन्स्टाग्रामवर प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी मलायका लाखो रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका पोस्टसाठी 15 ते 16 लाख रुपये घेते. कारण इन्स्टाग्रामवर मलायकाचे फॅन फॉलोइंग प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे.
मलायकाला इंस्टाग्रामवर 15.8 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. यामुले तीने एकदा पोस्ट शेअर केली की ती तत्काळ व्हायरल होते. मलायका पापाराजीचीही फेव्हरीट आहे. ती मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडो अथवा बी टाऊन पार्टीसाठी पापाराझी तीच्या फोटोसाठी तासंतास वाट वाहते. मलायका 48 वर्षांची आहे.