एपस्टीन फाइल्समध्ये बॉलिवूडच्या अनुराग कश्यपच्या नावाने खळबळ, खुलासा करत म्हणाला- "मी अजूनपर्यंत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:16 IST2026-02-12T14:15:58+5:302026-02-12T14:16:24+5:30

जेफ्री एपस्टीनच्या संदर्भात असलेल्या या फाइल्समध्ये बॉलिवूडमधील काही कलाकारांची नावं आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक असलेल्या अनुराग कश्यपच्या नावाचा उल्लेख असलेला स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावर आता अनुराग कश्यपने प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. 

bollywood director anurag kashyap break silence on being named in epstein files | एपस्टीन फाइल्समध्ये बॉलिवूडच्या अनुराग कश्यपच्या नावाने खळबळ, खुलासा करत म्हणाला- "मी अजूनपर्यंत..."

एपस्टीन फाइल्समध्ये बॉलिवूडच्या अनुराग कश्यपच्या नावाने खळबळ, खुलासा करत म्हणाला- "मी अजूनपर्यंत..."

गेल्या काही दिवसांपासून एपस्टीन फाइल्स संदर्भातील धक्कादायक खुलासे, फोटो आणि व्हिडीओने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. एपस्टीन फाइल्समध्ये अनेक बड्या असामींची नावं आल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जगभरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची नावंही या फाइलमध्ये आहेत. ज्यामुळे मोठा धक्का बसला आहे. जेफ्री एपस्टीनच्या संदर्भात असलेल्या या फाइल्समध्ये बॉलिवूडमधील काही कलाकारांची नावं आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक असलेल्या अनुराग कश्यपच्या नावाचा उल्लेख असलेला स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावर आता अनुराग कश्यपने प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. 

एपस्टीन फाइल्सच्या एका ईमेलमध्ये अनुराग कश्यपच्या नावाचा उल्लेख आहे. व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये २०१७मध्ये अनुराग कश्यपला बीजिंगमधील एपस्टीनच्या एका कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. या ईमेलमध्ये त्याचा उल्लेख Bollywood Guys आणि Famous Bollywood Director असा करण्यात आल्याचं दिसत आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अनुरागने याबाबत प्रतिक्रिया देताना त्याची बाजू मांडली आहे. "मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला रोज असे ईमेल येतात. महिन्याला जवळपास वक्ता म्हणून १५ आमंत्रणं येतात. पण मी क्वचितच प्रतिसाद देतो. मी अजूनपर्यंत कधीही बीजिंगला गेलेलो नाही. त्या ईमेलमधून काहीही स्पष्ट होत नाही", असं म्हणत अनुरागने स्पष्टीकरण दिलं आहे. 

अनुराग कश्यप हे बॉलिवूडमधील खूप मोठं नाव आहे. त्याने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. काही सिनेमांमध्ये त्याने कामंही केलं आहे. अनुरागने स्पष्टीकरण देत एपस्टीन फाइल्सबाबत त्याची बाजू स्पष्ट केली आहे. या प्रकरणात अजून कोणते नवे खुलासे होणार, हे पाहावं लागेल. 

Web Title : एपस्टीन फाइल्स में नाम आने पर अनुराग कश्यप ने किया खंडन।

Web Summary : एपस्टीन फाइल्स में अनुराग कश्यप का नाम 2017 के संभावित बीजिंग कार्यक्रम के निमंत्रण के संबंध में सामने आया। कश्यप ने किसी भी संलिप्तता से इनकार किया, कहा कि उन्हें कई निमंत्रण मिलते हैं और उन्होंने कभी बीजिंग का दौरा नहीं किया। एक स्क्रीनशॉट वायरल होने के बाद उन्होंने अपनी स्थिति स्पष्ट की।

Web Title : Anurag Kashyap denies Epstein link after name surfaces in files.

Web Summary : Anurag Kashyap's name surfaced in Epstein files regarding a potential 2017 Beijing event invitation. Kashyap denies any involvement, stating he receives numerous invitations and has never visited Beijing. He clarified his position after a screenshot went viral.