​कॉन्सर्टआधी एड शीरनसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनी केली ग्रॅण्ड पार्टी! पाहा Inside Photos!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 10:52 IST2017-11-19T05:22:03+5:302017-11-19T10:52:03+5:30

ब्रिटीश वंशाचा लोकप्रीय गायक एड शीरन सध्या भारतात आहे. आज रविवारी मुंबईत एड शीरनचे लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. ‘शेप ...

Bollywood celebrities have a grand party with Ed Shearen before the concert! Watch Inside Photos !! | ​कॉन्सर्टआधी एड शीरनसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनी केली ग्रॅण्ड पार्टी! पाहा Inside Photos!!

​कॉन्सर्टआधी एड शीरनसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनी केली ग्रॅण्ड पार्टी! पाहा Inside Photos!!

रिटीश वंशाचा लोकप्रीय गायक एड शीरन सध्या भारतात आहे. आज रविवारी मुंबईत एड शीरनचे लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. ‘शेप आॅफ यू’ या गाण्याने जगभरातील लोकांना वेड लावणाºया एड शीरनला लाईव्ह ऐकण्यासाठी तरूणाई आतूर झालीयं.  काल रात्रीचं शीरन भारतात पोहोचला. याच रात्री त्याच्या भारतातील आगमनाप्रीत्यर्थ कोरिओग्राफर फराह खान हिने एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते.





या पार्टीत शाहरूख खानपासून, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जोहर, मलायका अरोरा, नेहा धूपिया असे सगळे बॉलिवूड स्टार्स दिसले. या पार्टीचे काही इनसाईड फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटी एड शीरनची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत. हे फोटो पाहा आणि कसे वाटले ते आम्हाला कळवा.





२६ वर्षीय एड शीरनने २००४ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा पासून त्याच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी लोकांवर जादू केली आहे. ‘शेप आॅफ यू’ हे शीरनचे सर्वाधिक लोकप्रीय गाणे आहे. आत्तापर्यंत या गाण्याला यू ट्यूबवर २७१ कोटींवर व्यूज मिळाले आहेत.





एड शीरनच्या भारतातील फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एड शीरन यावर्षी जगभरातील नऊ शहरांमध्ये जाऊन वर्ल्ड टूर करणार आहे. यात भारताचाही समावेश आहे. या टूरअंतर्गत शीरन भारतात आहे. काही महिन्यांपूर्वी पॉप गायक जस्टिन बीबर हा भारतात येऊन गेलाय. त्याची लोकांसह सेलिब्रेटींमध्ये असलेली क्रेझ मुंबईने अनुभवली आहे. जस्टिनचे बॉलिवूडमध्येही अनेक चाहते असल्याचे त्याच्या कॉन्सर्टदरम्यान स्पष्ट झाले. शीरनही लोकप्रीयतेच्या बाबतीत बीबरपेक्षा कुठेही कमी नाही. त्यामुळे एड शीरनचा भारत दौराही तितकाच यशस्वी राहिल यात काही शंका नाही.  

Web Title: Bollywood celebrities have a grand party with Ed Shearen before the concert! Watch Inside Photos !!