बेबी बंपसोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:42 IST2021-09-17T17:41:52+5:302021-09-17T17:42:14+5:30

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिची दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करताना दिसते आहे

The Bollywood actress was seen enjoying in the pool with baby bump, pregnancy glow appeared on her face | बेबी बंपसोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

बेबी बंपसोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिची दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करताना दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण स्पेशल बनवण्यासाठी ती काहीतरी नवीन ट्राय करताना दिसते. दरम्यान नेहाचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिने स्वतःच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

नेहा धुपिया आणि अंगद बेदीचे दुसरे बाळ येणार आहे. यापूर्वी त्यांना एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी २-३ महिन्यात ती बाळाला जन्म देईल. नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पूल सेशन दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. पूल सेशन फोटोत नेहा स्विमसूटमध्ये दिसते आहे आणि गॉगल लावलेला दिसतो आहे. या फोटोत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते आहे. या फोटोत नेहाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसतो आहे.


पूल किनारी नेहा धुपिया खूप रिलॅक्स दिसते आहे आणि आकाशाकडे पाहत ती पोझ देताना दिसते आहे. याशिवाय ती पाण्यात पाय टाकून बसलेलीही दिसते आहे. नेहाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. ते तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 


नेहा धुपिया दुसऱ्या प्रेग्नेंसीत खूप एक्टिव्ह आहे. ती नेहमी जिम आणि योगा सेशनदरम्यानचे फोटो शेअर करत असते. तिच्या फिटनेस आणि येणाऱ्या बाळाबद्दल काही खास टिप्स देत राहते.

Web Title: The Bollywood actress was seen enjoying in the pool with baby bump, pregnancy glow appeared on her face