Bholaa Movie: ...तेव्हा मी गप्पच बसते; Tabu ने स्पष्टपणे मांडलं मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 12:13 IST2023-04-07T12:12:15+5:302023-04-07T12:13:11+5:30
‘भोला’ चित्रपटामधील तब्बूच्या कामाचं सर्वांकडूनच विशेष कौतुक

Bholaa Movie: ...तेव्हा मी गप्पच बसते; Tabu ने स्पष्टपणे मांडलं मत
Tabu , Bholaa Movie: अभिनयातील सध्याची इनिंग तब्बूसाठी खूपच फायदेशीर ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. १९८२ पासून आजतागायत तब्बू सातत्याने विविधांगी भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकत आहे. अलीकडच्या काळातील ‘दृश्यम १-२’, ‘दे दे प्यार दे’, ‘भूलभुलैया २’ आणि मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘भोला’ चित्रपटामधील तब्बूच्या कामाचं सर्वांकडूनच विशेष कौतुक केलं जात आहे. आपल्या या यशासोबतच होणाऱ्या कौतुकाबाबत तब्बू म्हणाली की, या विषयी सर्वच बोलत असल्यानं मी काय बोलू? माझ्या काहीही न बोलण्यानं वस्तुस्थिती लपून राहणार नाही.
तेव्हा मी गप्प बसते...
"जेव्हा जग काही बोलतं, तेव्हा आपण शांत बसावं. सगळे बोलत असताना मी का बोलू?" असंही ती म्हणाली. भविष्यात ‘खुफियां’, ‘औरों में कहां दम था’ आणि ‘द क्रू’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.