पत्नीच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडले, १३ वर्षांचा भरला संसार मोडला! श्रीदेवी अन् बोनी कपूर यांचं सूत कसं जुळलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:54 IST2025-08-13T12:43:45+5:302025-08-13T12:54:03+5:30
श्रीदेवी अन् बोनी कपूर यांची फिल्मी लव्हस्टोरी, जाणून घ्या...

पत्नीच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडले, १३ वर्षांचा भरला संसार मोडला! श्रीदेवी अन् बोनी कपूर यांचं सूत कसं जुळलं?
Shridevi:बॉलिवूडची 'मिस हवाहवाई' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहेत. हिंदी सिनेसृष्टीत त्यांचं मोठं योगदान आहे. 'जुदाई', 'मिस्टर इंडिया', 'लाडला' तसेच 'चालबाज' यांसारखे सुपरहिट चित्रपट देऊन त्यांनी इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं. श्रीदेवी यांचं निधन होऊन बराच कालावधी लोटला आहे. मात्र, त्या आजच्या चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. दरम्यान, श्रीदेवी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लव्हस्टोरी कोणत्याही फिल्मीस्टोरीपेक्षा कमी नाही. त्याकाळी श्रीदेवी- बोनी कपूर यांच्या नात्याबद्दल इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा झाली.
बोनी कपूर यांच्या घरी राहायच्या श्रीदेवी, कारण ...
पहिलं लग्न झालेलं असताना बोनी कपूर श्रीदेवी यांच्या प्रेमात अकंठ बुडाले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. खरंतर, बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि श्रीदेवी या एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी होत्या. याच कारणामुळे मोनाने एकदा श्रीदेवीला तिच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. त्याचदरम्यान, श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या अफेअरची चर्चा होती. त्यावेळी चक्क श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांनी राखी देखील बांधली होती. एका मुलाखतीत मोना यांनी याबद्दल खुलासा केला होता. पण जेव्हा मोना कपूरला श्रीदेवीच्या गरोदरपणाबद्दल कळलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यानंतरच मोना कपूर आणि बोनी कपूर यांचा घटस्फोट झाला.
असे जुळले सूत...
श्रीदेवी यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी त्यांना बारा वर्षे लागले होते. बोनी सांगतात की, त्यांनी श्रीदेवी यांना जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले तेव्हा त्यांच्यावर प्रेम जडलं होतं. श्रीदेवी यांना भेटण्यासाठी त्यांनी चक्क चेन्नई गाठली होती. त्यानंतर मिस्टर इंडिया चित्रपटाची ऑफर घेऊन ते श्रीदेवी यांच्याकडे गेले, याच चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर २ जून, १९९६ ला लग्नबेडीत अडकले.