"खूप कठीण...", सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याबद्दल लेक साराची भावुक प्रतिक्रिया, 'अशी' झालेली कुटुंबियांची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:59 IST2025-12-27T12:50:41+5:302025-12-27T12:59:05+5:30
"तो काळ घरातील प्रत्येकासाठी...", वडिलांवरील चाकू हल्ल्याबद्दल सारा अली खानच्या मनात आजही भीती; म्हणाली...

"खूप कठीण...", सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याबद्दल लेक साराची भावुक प्रतिक्रिया, 'अशी' झालेली कुटुंबियांची अवस्था
Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गेल्या वर्षी १६ डिसेंबर २०२४ च्या मध्यारात्री एका अज्ञाताने घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. या जीवघेण्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता त्याच्या पाठीत ते शस्त्र रुतलं होतं. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या घटनेनंतर कपूर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. तसेच यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि ते वातावरण अजूनही आहे. नुकतंच लेक साराने एका मुलाखतीत याप्रकरणी भाष्य केलं आहे.
अलिकडेच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सारा अली खानने आजी शर्मिला टागोर यांच्यासोबत हजेरी लावली. दरम्यान, तिने त्या वेळच्या परिस्थितीबद्दलही तिच्या भावना व्यक्त केल्या. या मुलाखतीमध्ये सारा म्हणाली," जेव्हा कठीण काळ येतो, तेव्हा त्याचा सामना संयमाने आणि धीराने केला पाहिजे.या वर्षी, जेव्हा माझ्या वडिलांवर हल्ला झाला होता.तेव्हा तो काळ घरातील प्रत्येकासाठी कठीण होता. त्या काळात आम्ही सर्वांनी एकमेकांना आधार दिला. ही घटना आमच्या सर्वांच्या मनात कायम राहिली आहे."
पुढे सारा म्हणाली, "त्या काळात मी माझ्या आजीला स्वतःला सांभाळताना पाहिलं आहे. घाबरून न जाता किंवा खचून न जाता, तिने मोठ्या संयमाने त्या परिस्थितीचा सामना केला. हा अनुभव खूप काही शिकवणारा होता." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.
सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसली होती. हा सिनेमा अनुराग बसूंच्या २००७ सालच्या 'लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटाचा सिक्वेल होता. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, अली फजल आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट होती.