इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करूनही रेखा यांना वाटते 'या' गोष्टीची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 12:17 PM2024-04-07T12:17:42+5:302024-04-07T12:20:58+5:30

रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात.

Bollywood actress Rekha Had Regrets For Not Learning Dance At Her Career Peak | इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करूनही रेखा यांना वाटते 'या' गोष्टीची खंत

इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करूनही रेखा यांना वाटते 'या' गोष्टीची खंत

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवलं. संसार, जानी दुश्मन, गंगा की सौगंद, शेषनाग, अगर तुम ना होते, असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले. रेखा यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. आजही ६८ वर्षांच्या रेखा त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करतात. ऐवढं यश, प्रसिद्धी आणि पैसा मिळवूनदेखील रेखा यांना आजही एका गोष्टीची खंत वाटते. 

रेखा यांनी १९५४ पासून बालकलाकार म्हणून दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तर 1970 मध्ये 'सावन भादो' या चित्रपटातून अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनयासह रेखा आपल्या नृत्यासाठी देखील ओळखल्या जातात. पण, अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, नृत्यासाठी त्यांनी कधीही प्रशिक्षण घेतलं नाही आणि याची त्यांना खंत आहे.

रेखा यांनी बीबीसीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, 'मी कधीच नृत्य शिकले नाही. माझ्या आईने आम्हाला जबरदस्तीने नृत्यशाळेत पाठवलं होतं, पण मी कधीच लक्षपूर्वक शिकले नाही. पण आता मला असं वाटतं की मी व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायला हवं होतं.  नृत्य ही एक अशी गोष्ट आहे की, जर तुम्हाला ती आतून वाटत असेल तर तुम्ही ती करू शकता'.

रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन केले आहे.  रेखा आजही भल्या भल्या अभिनेत्रींना त्यांच्या सौंदर्याने आणि अदांनी मागे टाकतात. रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात.

Web Title: Bollywood actress Rekha Had Regrets For Not Learning Dance At Her Career Peak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.