२२ वर्षात २५ फ्लॉप चित्रपट, रिजेक्शनचाही केलाय सामना; तरीही कोटींच्या घरात फीस घेते ही अभिनेत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:59 PM2024-04-12T16:59:16+5:302024-04-12T17:02:42+5:30

बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी अनेक कलाकारांना मोठा स्ट्रगल करावा लागला आहे. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू पडद्यावर चालली नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सेलिब्रिटीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

bollywood actress rehna hai tere dil mein fame dia mirza face lots of rejection industry struggle story | २२ वर्षात २५ फ्लॉप चित्रपट, रिजेक्शनचाही केलाय सामना; तरीही कोटींच्या घरात फीस घेते ही अभिनेत्री 

२२ वर्षात २५ फ्लॉप चित्रपट, रिजेक्शनचाही केलाय सामना; तरीही कोटींच्या घरात फीस घेते ही अभिनेत्री 

Diya Mirza : बॉलिवूडमध्ये असे काही नायक किंवा नायिका होऊन गेल्या ज्यांना त्यांच्या संघर्षाच्या काळात रिजेक्शनचा सामना करावा लागला. त्यांना रंग-रूप आणि शरीरयष्टीवरून बऱ्याचदा हिणवण्यात आलं. पण इंडस्ट्रीत अशी ही एक अभिनेत्री आहे ती प्रचंड सुंदर असूनही अनेकदा तिला नकार पचवावा लागला. त्यानंतर सिनेसृष्टीत पदर्पण केल्यानंतरही तिला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही.

पहिला सिनेमा ठरला फ्लॉप -

साधारणत: २००१ मध्ये अभिनय क्षेत्रात तिने पाऊल ठेवलं. या नायिकेने तिच्या २२ वर्षांच्या सिनेकारकिर्दीत फक्त ४ हिट सिनेमे दिले. तरीही हताश न होता आजही अभिनेत्री इंडस्ट्रीत टिकून आहे. ही अ‍ॅक्ट्रेस दुसरी -तिसरी कोणी 'रहना हैं तेरे दिल में'  फेम दिया मिर्झा आहे.  या चित्रपटामधून दियाने बॉलवूडमध्ये एंट्री केली असली तरी त्याआधी तिने मार्केटिंग एक्झिक्यूटीव्ह म्हणून काम पाहिलंय. पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर दियाचे तब्बल एकामागोमाग १२ सिनेमे फ्लॉप ठरले.

'फिर हेरा फेरी' चित्रपटामुळे मिळाली ओळख  - 

अक्षय कुमारसोबत 'फिर हेरा फेरी' या चित्रपटात काम करून दियाने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर दिया मिर्झाने 'लगे रहो मुन्ना भाई', 'शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे दमदार चित्रपट दिले. 

मोठ्या पडद्यावर अपयशी ठरली तरी दिया आजच्या घडीला एका चित्रपटासाठी तब्बल २ कोटी इतकं मानधन घेते. तसंच अभिनेत्रीचं स्वत: चं हाऊस वन इंडिया स्टोरीज एलएलपी नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. शिवाय दिया २२ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. 

Web Title: bollywood actress rehna hai tere dil mein fame dia mirza face lots of rejection industry struggle story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.