'आझाद' नंतर राशा थडानीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट! साउथ सुपरस्टारच्या पुतण्यासोबत झळकणार, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:44 IST2025-08-25T13:35:55+5:302025-08-25T13:44:05+5:30
बॉलिवूड गाजवल्यानंतर रवीना टंडनची लेक राशा करणार तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण?

'आझाद' नंतर राशा थडानीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट! साउथ सुपरस्टारच्या पुतण्यासोबत झळकणार, कोण आहे तो?
Rasha Thadani: अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. ९० च्या दशकातील आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव अग्रस्थानी येतं. दरम्यान, रवीना टंडनच्या पावलावर पाऊल ठेवत तिची लेक राशा थडानीने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. राशाने आझाद चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अजय देवगणस त्याचा पुतण्या अमन देवगणही मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. अशातच मनोरंजन क्षेत्रातून राशा थडानीच्या अपकमिगं प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूडनंतर राशा आता तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती मिळते आहे.
'आझाद' चित्रपटात राशा थडानीवर चित्रीत केलेलं 'उई अम्मा' हे गाणं खूपच हिट झालं. शिवाय त्यामधील अभिनेत्रीने केलेलं नृत्याचंही अनेकांनी प्रशंसा केली.आपल्या आईप्रमाणेच राशा देखील उत्तम नृत्यांगणा आहे असं म्हटलं गेलं. आता राशा थडानी अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली असून लवकरच ती नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार. मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडनंतर, ती आता दक्षिणात्य सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावणार आहे. राशा थडानी साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा पुतण्या जयकृष्ण घट्टामनेनीसोबत तेलुगु चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. जयकृष्ण हा अभिनेते, निर्माते रमेश बाबू यांचा मुलगा आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जय कृष्ण घट्टामनेनीचा ही डेब्यू सिनेमा आहे. 'RX100' आणि 'मंगलवरम ' सारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अजय भूपती या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.हा चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित असेल. चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीज आणि आनंदी आर्ट क्रिएशन्सच्या बॅनरखाली होणार आहे.दरम्यान, याबाबत राशा थडानी किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.