लग्नाला १ वर्ष होताच रकुल प्रीत सिंग अन् जॅकी भगनानीने दिली गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:45 IST2025-05-13T11:40:30+5:302025-05-13T11:45:23+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय असं कपल आहे.

लग्नाला १ वर्ष होताच रकुल प्रीत सिंग अन् जॅकी भगनानीने दिली गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Rakul Preet Singh : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अभिनेता जॅकी भगनानी हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय असं कपल आहे. गेल्यावर्षी २१ फेब्रुवारीला रकुल आणि जॅकी भगनानी यांचा गोव्यात मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. दक्षिण गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंजाबी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने रकुल-जॅकी यांचा विवाह झाला. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूडसेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या सुखी संसाराची वर्षपूर्ती झाली आहे. रकुल आणि जॅकी दोघंही त्यांचं वैवाहिक आयुष्य सुंदररित्या जगताना दिसत आहेत. अशातच लग्नाच्या एक वर्षानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या सोशल मीडियावर या कपल बद्दलतुफान चर्चा रंगली आहे. अलिकडेच रकुल आणि जॅकी भगनानीला मुंबईतील एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. त्यांचे डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे स्टार कपल खूपच कूल आणि कम्फर्टेबल दिसले. त्यादरम्यान, रकुल आणि जॅकी कॅज्युअल पोशाखात दिसले. यावेळी लोकांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे रकुलचे शूज. रकुल प्रीत सिंह हिल्सऐवजी पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. रकुलने पायात केवळ शूज घातल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाल्या.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचे व्हायरल फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत. शिवाय या जोडप्यावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण, रकुल आणि जॅकी याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्याचबरोबर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, अभिनेत्रीने पाठीची शस्त्रक्रिया केली आहे, म्हणूनच तिने शूज घातले आहेत.