बाबो! हिरोंनाही लाजवेल असं वर्कआऊट, फिटनेससाठी अभिनेत्री घेतेय प्रचंड मेहनत, पाहा थक्क करणारा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:03 IST2024-07-26T14:03:22+5:302024-07-26T14:03:47+5:30
एका बॉलिवूड अभिनेत्रीचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे.

बाबो! हिरोंनाही लाजवेल असं वर्कआऊट, फिटनेससाठी अभिनेत्री घेतेय प्रचंड मेहनत, पाहा थक्क करणारा व्हिडिओ
कलाकारांना अभिनयाबरोबरच त्यांच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष द्यावं लागतं. झिरो फिगरसाठी अभिनेत्रीही प्रचंड मेहनत घेताना दिसतात. यासाठी डाएट फॉलो करण्याबरोबरच सेलिब्रिटी वर्कआऊटही करताना दिसतात. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे.
रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदी सिनेमांमबरोबरच तिने साऊथमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेली रकुल प्रीत सिंग तिच्या फिटनेसकडेही लक्ष देताना दिसते. आता रकुलचा जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती कठीण वर्कआऊट करताना दिसत आहे. जीम ट्रेनरच्या मदतीने रकुलने हे वर्कआऊट केलं आहे. या व्हिडिओत एका पायाने बॅलेन्स करत तिने तिच्या मांडीवर वजन घेतल्याचं दिसत आहे. या वर्कआऊटचा व्हिडिओ रकुलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी रकुलचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अलिकडेच रकुल प्रीत सिंगने अभिनेता जॅकी भगनानीशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. रकुल आणि जॅकी भगनानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.