४३ वर्षीय अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, करण्यात आली सर्जरी, म्हणाली- "आजार लवकर लक्षात आला पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:06 IST2026-03-04T11:05:46+5:302026-03-04T11:06:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. राजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. स्टेज १ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं तिने सांगितलं आहे.

bollywood actress rajashri deshpande diagnosed with breast cancer undergoes surgery | ४३ वर्षीय अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, करण्यात आली सर्जरी, म्हणाली- "आजार लवकर लक्षात आला पण..."

४३ वर्षीय अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, करण्यात आली सर्जरी, म्हणाली- "आजार लवकर लक्षात आला पण..."

बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. राजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. स्टेज १ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं तिने सांगितलं आहे. सर्जरीनंतरचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत तिने याबाबत चाहत्यांना पोस्टमधून माहिती दिली आहे. सध्या राजश्री कॅन्सरवर उपचार घेत आहे. 

पोस्टमध्ये राजश्रीने म्हटलं आहे की "तुम्ही जर हे वाचत असाल याचा अर्थ शेवटी मला माझ्या आई-वडिलांना सांगण्याचं धैर्य मिळालं की मला Infiltrating Ductal Carcinoma (NOS) म्हणजेच स्टेज १ स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. आता तुम्हा सगळ्यांनाही हे सांगण्याची वेळ आली आहे. सुदैवाने, नियमित तपासणीतच हा आजार लवकर लक्षात आला आणि त्यामुळे याच्यासोबत लढण्याची संधी मिळाली. असंख्य चाचण्या आणि शस्त्रक्रिया हा एक रोलरकॉस्टर प्रवासच होता. पण खरंच सांगते, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीनेच मला हे सगळं पार करता आलं. शस्त्रक्रियेनंतर आई आणि पप्पांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं आणि माझ्या भीतीचं रूपांतर ताकदीत झालं. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आता मला जग जिंकता येईल असं वाटतंय". 


"आता मी छानपणे बरी होत आहे आणि लवकरच रुग्णालयातून घरी परतणार आहे. डॉ. मंदर नाडकर्णी आणि कोकिलाबेन हॉस्पिटल यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे आणि काळजीमुळे हा प्रवास खूपच सौम्य आणि सुसह्य झाला. तुमचं प्रेम हेच खरं माझं सर्वात मोठं औषध आहे. आता पुढे उपचार, आशा आणि उज्ज्वल दिवसांच्या स्वागतासाठी सज्ज आहे", असंही तिने पुढे म्हटलं आहे. 

राजश्री देशपांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सत्यशोधक', 'सेक्सी दुर्गा', 'चोक', 'जोराम', 'किक', 'तलाश' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 'सॅक्रेड गेम्स', 'द फेम गेम', 'ब्लॅक वॉरंट' अशा वेब सीरिजमध्येही ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. 

Web Title : अभिनेत्री राजश्री देशपांडे को ब्रेस्ट कैंसर, सर्जरी हुई

Web Summary : अभिनेत्री राजश्री देशपांडे को स्टेज 1 ब्रेस्ट कैंसर का पता चला। नियमित जांच से जल्दी निदान हुआ, उनकी सर्जरी हुई और वे ठीक हो रही हैं। उन्होंने इस मुश्किल समय में मिले समर्थन के लिए आभार व्यक्त किया और जल्द ही घर लौटने की उम्मीद जताई।

Web Title : Actress Rajshri Deshpande Diagnosed With Breast Cancer, Underwent Surgery

Web Summary : Actress Rajshri Deshpande revealed she has stage 1 breast cancer. Diagnosed early through routine checkups, she underwent surgery and is recovering well. She expressed gratitude for the support received during this challenging time and is looking forward to returning home soon.