मुस्लिमांपेक्षा हिंदूच चांगले आहेत! आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुमताज यांचं थेट वक्तव्य, म्हणाल्या- "एक बायको असताना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:55 IST2026-03-12T15:53:43+5:302026-03-12T15:55:33+5:30
मुस्लिम धर्म असलेल्या मुमताज यांनी हिंदू धर्मीय मयुर यांच्याशी लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य केलं.

मुस्लिमांपेक्षा हिंदूच चांगले आहेत! आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुमताज यांचं थेट वक्तव्य, म्हणाल्या- "एक बायको असताना..."
मुमताज या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहे. हिंमत, माँ और ममता, हमराझ, लोफर, अपराध, प्यार का रिश्ता, सिंकदर ए आझम यांसारख्या सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ६०-७०च्या दशकात त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. करिअरच्या शिखरावर असतानाच मुमताज यांनी १९७४मध्ये बिजनेसमॅन मयूर माधवानी यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. लग्नानंतर त्यांनी बॉलिवूडला रामराम केला. मुस्लिम धर्म असलेल्या मुमताज यांनी हिंदू धर्मीय मयुर यांच्याशी लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य केलं.
मुमताज यांनी सितारों का सफर या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, "मला भगवान शंकर आणि श्रीकृष्ण प्रिय आहेत. मी मुस्लिम असूनही त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. माझ्या घरात भगवान गणेशाची मूर्ती आहे. त्यांना मी रोज नमस्कार करते. भगवान शंकर यांच्यावर माझी श्रद्धा आहे. मला वाटतं की ते सगळ्यात सुंदर देवता असावेत. मी दोन्ही धर्मांचे पालन करते. मी एका हिंदू व्यक्तीशी लग्न केलं आहे. माझ्या बहिणीनेही हिंदू व्यक्तीसोबत लग्न केलं. आम्ही दोघीही खूप भाग्यवान आहोत. माझे पती माझी खूप काळजी घेतात. हिंदू-मुस्लिम विभाजनाच्या गोष्टी लोक का करतात, हे मला कळत नाही. माझा याच्यावर विश्वास नाही".
पुढे त्या म्हणाल्या, "मी नेहमी सांगते की मी एका हिंदू व्यक्तीशी लग्न केलं आहे. माझी बहीण आणि मी दोघीही आनंदी आहोत. मुस्लिम धर्मात अनेक पुरुष ३-४ लग्न करतात. पत्नीला सोडून देतात. मग हिंदूपेक्षा ते चांगले कसे असतील? कुठल्याही पुरुषाला ३-४ वेळा लग्न नाही केलं पाहिजे. मी स्वत: एक मुस्लिम आहे आणि मला हे चुकीचं वाटतं. एक पत्नी असताना दुसरं लग्न करायचं आणि तिसरी पत्नी आणायची. अशा नात्यांमध्ये प्रत्येक महिला अधिकार सांगणारी असते. एक पत्नी असताना दुसरं लग्न करणं हे पाप नाही का?".
"यानुसार तर मला मुस्लिमांपेक्षा हिंदूच चांगले वाटतात. बहुतांश हिंदू हे एकच लग्न करतात. कधी कधी ते दुसरं लग्न करू शकतात. मात्र याचा अर्थ असा होत नाही की एकीला सोडून ते दुसरीकडे जातील. हे पूर्णपणे चुकीचं आहे", असं मत मुमताज यांनी व्यक्त केलं आहे. मुमताज आणि मयुर माधवानी यांना नताशा आणि तान्या या दोन मुली आहेत.