अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 08:00 IST2018-10-04T11:47:27+5:302018-10-05T08:00:00+5:30

अदाचा हा फंडाही रसिकांना भावला असून लंडनमध्ये हा व्हिडीओ. चित्रीत करण्यात आला आहे. 

Bollywood actress Monkey Dosage Viral on social media, you can also smile by holding the belly ... | अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

बॉलिवूड अभिनेत्री अदा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर या ना त्या पद्धतीने अदा तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. कधी आपल्या आजीसह ती डान्स करते तर कधी एखादं चॅलेंज पूर्ण करताना ती पाहायला मिळते. मात्र आता अदाने असं काही केलंय की जे पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल. तिने एका माकडाचा मुखवटा लावून मंकी डान्स केला आहे आणि तिच्या सोशल मीडियावरील डान्सच्या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक नेटिझन्सनी पाहिला आहे. अदाचा हा फंडाही रसिकांना भावला असून लंडनमध्ये हा व्हिडीओ. चित्रीत करण्यात आला आहे. 


या व्हिडीओसोबत अदाने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. बोटाची जखम आता बरी होत असून तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी सगळ्यांचे आभार. लंडनमध्ये कुणीतरी आपल्याला माकडाचा हा मुखवटा भेट दिल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. आपलं दुखणं काही वेळासाठी विसरता यावं यासाठी हा मुखवटा घालून अदाने डान्स केला आणि हसत हसत या डान्सचा धम्माल आनंद लुटला. या डान्स मस्तीचा फायदा झाल्याचंही तिने नमूद केलं आहे.

 

शूटिंगच्या दरम्यान लंच ब्रेकच्या काळात हा व्हिडीओ शूट केला आहे. दिग्दर्शक अभिनेता प्रभूदेवा यांच्या अनेक गाण्यातील आवडत्या गाण्यांपैकी एक हे गाणं आहे असंही अदाने म्हटले आहे. प्रभूदेवा यांच्यासोबत सिनेमा करत असल्याचा आनंद आहे असंही तिने स्पष्ट केले आहे. मात्र या व्हिडीओतील लूक हा आगामी चार्ली चॅप्लिन-२ किंवा कमांडो-३ या सिनेमातील नाही हेसुद्धा अदाने स्पष्ट केले आहे. २००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर हम है राही यार के आणि हंसी तो फंसी या सिनेमतही तिने भूमिका साकारल्या. मात्र या सिनेमांना फारसं यश मिळालं नाही. यानंतर विद्युत जामवालस अदा कमांडो-२ या सिनेमात झळकली. या सिनेमातली तिची भूमिका रसिकांना भावली. सध्या ती कमांडो-३ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. 

Web Title: Bollywood actress Monkey Dosage Viral on social media, you can also smile by holding the belly ...