सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:49 PM2024-05-10T16:49:16+5:302024-05-10T16:51:16+5:30

Laila Khan Murder : बॉलिवूड अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांना मुंबईतील सेशन कोर्टाने दोषी ठरवलं आहे.

Bollywood actress laila khan and 5 others was murdered by her step father parvez tak convicted to mumbai session court | सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा

सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा

बॉलिवूड अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांना मुंबईतील सेशन कोर्टाने दोषी ठरवलं आहे. लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात कोर्टाने त्यांना १३ वर्षांनी दोषी ठरवलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, लैला खान आणि कुटुंबातील ५ सदस्यांच्या हत्येप्रकरणी परवेज टाक यांना कोर्ट १४ मे रोजी शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. २०११ मध्ये लैला तिची आई शेलिना पटेल आणि अन्य चार भावंडांसोबत मिसिंग असल्याची तक्रार तिचे वडील नादिर पटेल यांच्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. 

यादरम्यान पोलिसांना नाशिकजवळील इगतपुरी येथे एक आगीने अर्ध जळलेलं फार्महाऊस सापडलं होतं. लैला खानच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनही नाशिकमध्येच दाखवत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर संशयाची सुई अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांवर गेली. त्या फार्महाऊसमध्येच परवेज यांनी लैला खानचा मृतदेह पुरला होता. इगतपुरीमधील बंगल्यातच संपत्तीवरुन त्याच्यांत वाद झाले होते. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी पत्नी शेलीनाची हत्या केली. शेलीनाची हत्या करताना पाहिल्यामुळे परवेजने लैला, तिची बहीण अमीना, जुळे भाऊ बहीण आणि चुलत बहीण रेश्माची हत्या केली होती. हत्येनंतर त्याच बंगल्यात त्यांनी मृतदेह पुरले होते. 

लैला खानने २००२ मध्ये कन्नड सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण केलं होतं. 'मेकअप' या कन्नड चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर राजेश खन्ना यांच्या 'वफा : अ डेडली लव्ह स्टोरी' या सिनेमात तिने काम केलं होतं. लैला खानचं बॉलिवूड करिअर अपयशी ठरलं. तिला बॉलिवूडमध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही.
 

Web Title: Bollywood actress laila khan and 5 others was murdered by her step father parvez tak convicted to mumbai session court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.